बापरे! अल्लू अर्जुनने वर्षभरात भरला इतका टॅक्स; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल शॉक
सुपर स्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा 2’ मुळे प्रचंड फेमस आहे. सोबतच अटकेच्या घडामोडींमुळे चर्चेत आहे. ‘पुष्पा 2’ ने जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
इन्कम टॅक्स भरण्यातही पुष्पा पुढे
अटकेच्या घडामोडींनंतर तर “पुष्पा 2” च्या कमाईत जास्तच वाढ झालेली पाहायला मिळाली. पण या सर्व चर्चांमधे अजून एका गोष्टीसाठी अल्लू अर्जुन चर्चेत आहे. जस पुष्पा 2 च्या माध्यमातून त्याने सर्वांना मागे टाकलं तसच त्याने अजून एका गोष्टीमध्ये अल्लू अर्जुनने मागे टाकलं आहे. ते म्हणजे इन्कम टॅक्स.
टॅक्स भरण्याच्या बाबतीतही अनेक कलाकारांना मागे टाकतो. 2023-2024 मध्ये अल्लू अर्जुनचा देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश झाला आहे.फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, देशातील टॉप 22 करदात्यांच्या यादीत अल्लू अर्जुन हा एकमेव तेलुगू अभिनेता आहे.
अल्लू अर्जुनने किती कर भरला?
अल्लू अर्जुनने 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 14 कोटी रुपयांचा कर भरला आहे, ज्यामुळे तो मनोरंजन उद्योगातील सर्वात मोठ्या करदात्यांपैकी एक बनला आहे.
अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती सुमारे 460 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.“पुष्पा 2” च्या ऐतिहासिक यशानंतर हिंदी प्रेक्षकांमध्येही त्याची लोकप्रियता वाढली आहे. “पुष्पा २: द रूल” च्या यशाने अल्लू अर्जुनला नवीन उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मात्र, या चित्रपटासाठी त्याने कोणतेही निश्चित शुल्क घेतले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या कमाईपैकी 40% रक्कम अल्लू अर्जुनला दिली जाणार असल्याचे म्हंटले जाते.
“पुष्पा 2: द रूल” च्या यशाने अल्लू अर्जुनला नवीन उंचीवर नेले आहे. मात्र, या चित्रपटासाठी त्याने कोणतेही निश्चित शुल्क घेतले नाही. “पुष्पा 2” ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 1200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि हा आकडा अजूनही वाढतोच आहे.
अल्लू अर्जुनकडे किती मालमत्ता आहे?
दरम्यान अल्लू अर्जुनच्या मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर, त्यांने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये पुष्पा आणि पुष्पा-2 हे त्याचे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत. एका रिपोर्टनुसार अल्लू अर्जुनची अंदाजे एकूण संपत्ती 460 कोटी रुपये आहे. अल्लू अर्जुनचा बेंगळुरूमध्ये एक आलिशान वाडा आहे ज्यामध्ये त्याचे कुटुंब राहते. तसेच हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये एक आलिशान बंगला आहे. त्यांची किंमत करोडोंमध्ये आहे. यासह, तो हैदराबादमधील जुबली हिल्समधील अमेरिकन स्पोर्ट्स बार आणि रेस्टॉरंट चेन बफेलो वाइल्ड विंग्सच्या फ्रेंचायझीचा मालक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List