‘सिन्हा यांनी मुलांना काय शिकवलं?’, संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या मुकेश खन्नाला सोनाक्षीचं सडेतोड उत्तर

‘सिन्हा यांनी मुलांना काय शिकवलं?’, संस्कारांवर बोट ठेवणाऱ्या मुकेश खन्नाला सोनाक्षीचं सडेतोड उत्तर

Sonakshi Sinha Slams Mukesh Khanna: ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने मुकेश खन्ना यांना खडेबोल सुनावले आहेत. सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. ज्यावर उत्तर देत सोनाक्षीने देखील संताप व्यक्त केला आहे. खन्ना यांनी सोनाक्षीच्या संस्कारांवर प्रश्न उपस्थित केले होते आणि तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलीला दिलेल्या संस्कारांवर टिप्पणी केली होती. सोनाक्षीने सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे मुकेश खन्ना यांना चेतावनी दिली आहे. ‘पुन्हा माझ्या कुटुंबियांबद्दल काही म्हणालात तर त्यावर उत्तर देईल…’ असं अभिनेत्री म्हणाली.

काय आहे प्रकरण?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या एका एपिसोडबद्दल चर्चा केली. ज्यामध्ये सोनाक्षीने ‘रामायण’ संबंधी विचारलेल्या एका प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं. यावर मुकेश खन्ना म्हणाले, सोनाक्षीने या प्रश्नाला चुकीचे उत्तर देण्याचे कारण म्हणजे तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा, ज्यांनी आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माशी संबंधित माहिती दिली नाही.

मुकेश खन्ना म्हणाले, ‘ही घटना शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलांवर केलेले संस्कार अपयशी ठरल्याचं दाखवत आहे. त्यांच्या मुलांना भारतीय संस्कृती आणि धर्म का शिकवला गेला नाही? मी सामर्थ्यवान असतो तर मुलांना बसवून भारतीय संस्कृती शिकवली असती…

मुकेश खन्ना यांना सोनाक्षीचं सडेतोड उत्तर

इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत सोनाक्षी म्हणाली, ‘नुकताच मी तुमचं वक्तव्य ऐकलं… ज्यामध्ये मी रामायणासंबंधी चुकीचं उत्तर दिल्यामुळे तुम्हा माझ्या वडिलांना जबाबदार ठरवलं…सर्व प्रथम, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की त्या दिवशी शोमध्ये दोन महिला होत्या ज्यांच्याकडे या प्रश्नाचे अचूक उत्तर नव्हतं, परंतु तुम्ही फक्त माझं नाव घेतलं. यावरून तुमचा वाईट हेतू स्पष्टपणे दिसून येतो.’

‘हा मान्य आहे, त्या दिवशी मला विसरायला झालं. जी एक सामान्य घटना आहे. राम यांचं जीवन आपल्याला माफ करा आणि विसरून जा… असं शिकवण देतं… जर राम मंथरा, कैकेयी आणि रावण यांना माफ करू शकतात तर तुम्ही का नाही?’

सोनाक्षीने मुकेश खन्ना यांना दिली चेतावनी

सोनाक्षी म्हणाली, ही घटना पुन्हा पुन्हा आठवून तुम्ही माझ्या आणि  कुटुंबावर नकारात्मक चर्चा करू नका, असा इशारा मुकेश खन्ना यांना दिला. आणि पुढच्या वेळी माझ्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर तुम्ही काही बोलाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळेच मी आज तुमच्यासोबत आदर आणि सन्मानाने बोलत आहे.

‘मला कोणतीही वादग्रस्त परिस्थीती निर्माण करायची नाही. पण जेव्हा माझ्या कुटुंबियांवर कोणी आक्रमन करेल, तर त्यांना मी विसरणार नाही आणि गप्प बसणार नाही. त्यामुळे मुकेश खन्ना यांनी आमच्या नावाचा वापर करत चर्चेत राहू नये…’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?