काय आहे स्लीप एपनिया? झोपेचा असा आजार जो तुमच्या थेट हार्ट आणि ब्रेनवर परिणाम करतो
sleep apnea : जर तुम्ही झोपताना वारंवार जोरजोराने घोरत असाल तर तुम्हाला सावधान व्हावे लागणार आहे. कारण पुढे जाऊन ही सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. झोपताना घोरल्यामुळे श्वसनात अडथळा निर्माण होतो. आणि त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरते. त्यामुळे हृदय आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. तर या लेखात आपण पाहूयात झोपेचा संबंध असलेला स्लीप एपनिया हा आजार नेमका काय आहे. आणि तो तुमच्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी कसा धोकादायक आहे ?
काय आहे स्लीप एपनिया ?
जर खूप काळापासून तुम्हाला झोपताना घोरण्याची सवय असेल तर हा एक आजार आहे. हा एक असा आजार आहे. ज्याचा इलाज संपू्र्णपणे होऊ शकत नाही. या आजाराला स्लीप एपनिया असे म्हणतात. जर तुम्ही दिवसभर खूप थकलेला आहात आणि तुम्ही झोप लागल्या लागल्या घोरु लागता तर घाबरण्याची काही गरज नाही असे दिल्लीच्या AIIMS चे पलमोनोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ मित्तल यांनी म्हटले आहे. परंतू तुम्ही जर रोजच घोरत असाल तर मात्र तुम्हाला एक आजार आहे. त्यासाठी तुमची स्लीप एपनिया टेस्ट करावी लागेल. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने स्लीप एपनिया या आजारावर झालेला सारा अभ्यास एकत्र करून संशोधन केलेले आहे. ज्यात धक्कादायक बाब उघड झालेली आहे. देशातील १३ टक्के लोक या आजाराने पीडीत असल्याचे उघडकीस आले आहे.
स्लीप एपनिया वजन वाढणे, लठ्ठपणा याच्यामुळे होतो. जर तुम्ही रोज घोरत असलात तर तुम्ही देखील स्लीप एपनियाची टेस्ट करायला हवी. याची चाचणी करण्यासाठी लॅबमध्ये रुग्णाला झोपवले जाते. त्यानंतर त्याच्या हृदय आणि मेंदूच्या कार्याचे मॉनिटरींग केले जाते. भारतात स्लीप फिजिशियन खूपच कमी आहे. परंतू काही पल्मनोलॉजिस्ट, ईएनटी, काही डेंटिस्ट देखील ही टेस्ट करतात.
हा आजार बरा होत नाही
स्लीप एपनिया संपूर्ण बरा होत नाही. परंतू उपचाराने त्याचा प्रभाव कमी केला जातो. यात एक सी पेप नावाची मशिन नाकाला लावून झोपायचे असते. या मशिनला आयुष्यभर वापरायचे असते. कारण हा आजार केवळ नियंत्रणात राहू शकतो. बरा होत नाही. यामुळे घोरणे आणि श्वास रोखण्याच्या अडचणी कमी होतात. कारण झोपताना घोरल्याने ऑक्सिजनची लेव्हल कमी होते. ऑक्सिजन कमी झाल्याने हृदय आणि मेंदूच्या आर्टीरिज कमजोर होतात. हा आजार खूप काळ चालला तर हार्ट अटॅक आणि ब्रेन अटॅक येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्हाला घोरत असाल तर तातडीने डॉक्टरांची भेट घ्या आणि उपचार करा. त्यामुळे हार्ट आणि ब्रेनचा वाढणारा धोका कमी होऊ शकतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List