पाकिस्तानात चार तरुणींची नावे गुगलवर सर्वाधिक सर्च
2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या वर्षात पाकिस्तानात चार तरुणींची नावे गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आली. यामध्ये सना जावेद, हरिम शाह, झोया नासिर, मिनाहील मलिक या चौघींचा समावेश आहे. सना जावेद हिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी निकाह केल्यानंतर ती चर्चेत आली. ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
हरिम शाह ही एक रील स्टार आणि यूटय़ूबर आहे. झोया नासीर हिने हिंदुस्थानच्या चांद्रयान मोहिमेबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर ती चर्चेत आली, तर मिनाहील मलिकसुद्धा एक रील स्टार असून तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List