खातेवाटपाचं सूत्र ठरलं; अजित पवारांकडे अर्थखातं नसणार, तर गृहखात्याबाबतही महत्त्वाचा निर्णय
5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता आठ दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापपर्यंत उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातवाटप जाहीर झालेलं नाही. तर उद्या (14 डिसेंबर) फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारपासून (16 डिसेंबर) विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी उद्या हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात कुणा-कुणाचा समावेश असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडे 21 खाती, शिवसेना शिंदे गटाकडे 13, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रिपदं असणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असणार आहे. तर अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती असणार आहेत.
बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List