रोहन बोपन्नाचा ‘भिडू’ बदलला, नव्या साथीदारासह टेनिस कोर्टवर उतरणार
हिंदुस्थानचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याची मॅथ्यू एबडेनसोबतची जोडी तुटली आहे. बोपन्नाने नवीन साथीदारही शोधला आहे. आगामी काळात कोलंबियाच्या निकोलस बरीएंटोससोबत टेनिस कोर्टवर उतरणार असल्याचे बोपन्नाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई मॅरेथॉनच्या टी-शर्ट आणि शूजचे अनावरण रोहन बोपन्नाच्या आणि स्टार स्क्वॉशपटू सौरव घोषाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना बोपन्ना म्हणाला की, गत दोन वर्षात मॅथ्यू एडबेनसोबतचा खेळ संस्मरणीय ठरला. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही चमकदार कामगिरी केली. मात्र आगामी सत्रामध्ये त्याला वेगळ्या साथीदारासोबत खेळायचे आहे. त्यामुळे मी निकोलस बरीएंटोसोबत जोडी जमवली.
ते वृत्त फेटाळले
मॅथ्यू एबडेनसोबत जोडी फुटल्यानंतर रोहन बोपन्ना डिडिनसोबत जोडी बनवणार असल्याचे वृत्त होते. मात्र हे वृत्त बोपन्नाने फेटाळून लावले. डिडिगसोबत जोडी बनवणार असल्याचे वृत्त खोटे आहे. एडबेनला आता नव्या खेळाडूसह मैदानात उतरायचे असल्याने माझ्याकडेही नवीन साथीदार शोधण्याशिवाय पर्याय नव्हता, असे बोपन्ना म्हणाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List