एखाद्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यास किती शिक्षा होऊ शकते? जाणून घ्या BNS चे नियम
बेंगळुरूमधील एका अभियंत्याने पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अभियंत्याने आत्महत्येपूर्वी 24 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. यानंतर त्याने दीड तासाचा व्हिडिओही बनवला. ज्यात त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. यासाठी त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले. एवढेच नाही तर अतुलने पोलीस आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्यांवर पुरुषांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल सुभाष यांच्या पत्नीने घटस्फोटानंतर सेटलमेंटसाठी कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती. तिची मागणी सातत्याने वाढत होती. यानंतर पत्नीने अतुलवर अनेक गुन्हेही दाखल केले. या सर्व गोष्टींना कंटाळून त्याने आत्महत्या केली. बेंगळुरू पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊया की, आत्महत्येस प्रवृत्त केल्यास किती शिक्षा होते?
बीएनएस अंतर्गत दिली जाते शिक्षा
भारतीय न्यायिक संहितेनुसार, बीएनएसच्या कलम 108 नुसार गुन्हा हा गुन्हा दाखल करण्यात येतो. जर यात दोनपेक्षा जास्त लोक सहभागी असतील तर कलम 3(5) जोडले जाते. कलम 108 नुसार एखाद्या व्यक्तीवर आरोप सिद्ध झाल्यास त्याला 10 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. या कलमांनुसार पोलीस कोणत्याही व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करू शकतात. याशिवाय हा गुन्हा अजामीनपात्र आहे.
बेंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी, भावजय, सासू आणि काका-सासरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुलचा भाऊ विकास कुमार याने मराठहळ्ळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List