पाकिस्तानच्या संघाला हिंदुस्थानात यावंच लागणार, BCCI ने ठणकावलं
Champions Trophy 2025 च्या आयोजनावरून हिंदुस्थान आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू आहे. यावर काहीच दिवसांपूर्वी तोडगा काढण्यात आला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तयार झाले. परंतु हिंदुस्थानात होणाऱ्या स्पर्धा सुद्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात याव्यात अशी अट PCB ने ठेवली. पाकिस्तानच्या या अटीला BCCI ने जशास तसे उत्तर दिले आहे.
चॅम्पियन्य ट्रॉफी हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात यावी यासाठी BCCI, ICC आणि PCB यांच्यामध्ये दुबई येथे बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये PCB ने आयसीसीची मागणी मान्य केली होती. परंतु हिंदुस्थानात होणाऱ्या स्पर्धा सुद्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात याव्यात अशी अट PCB ने ठेवली होती. त्यानुसार 2027 पर्यंत होणाऱ्या ICC च्या स्पर्धा या हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येतील. या कालावधीमध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये होणारा महिला वर्ल्ड कप आणि 2026 साली श्रीलंकेच्या संयुक्त आयोजनमाध्ये होणारा T-20 World Cup हिंदुस्थानामध्ये आयोजीत केला जाणार आहे. परंतु BCCI ने या संदर्भात मोठे वक्तव्य करत PCB ला मोठा धक्का दिला आहे.
हिंदुस्थानात 2026 साली होणारा टी-20 वर्ल्ड कप पूर्णपणे हायब्रीड पद्धतीने खेळवण्यात येणार नसल्याचे BCCI ने जाहीर केले आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, BCCI टी-20 वर्ल्डकप 2026 हायब्रीड पद्धतीने खेळवण्यास तयार आहे. त्यानुसार पाकिस्तानचे साखळी फेरीतील सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जातील. पाकिस्तानची ही अट BCCI ने मान्य केली आहे. परंतु सेमीफायनल आणि फायनलचा सामना हिंदुस्थानातच होणार असल्याचे BCCI ने जाहीर केले आहे. म्हणजेच पाकिस्तानचा संघ जर सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पोहोचला तर त्यांना हिंदुस्थानात येणे अनिवार्य आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List