सायलेंट नहीं, व्हायलेंट हू मैं! अभिनेता झालो नसतो तर अंडरवर्ल्डमध्ये असतो; नाना पाटेकर स्पष्टच बोलले
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाच्या बळावर मराठीसह बॉलीवूडमध्ये ही आपली छाप उमटवली. मात्र हेच नाना गेल्या काही काळापासून अनेक वादात अडकल्याचे आपल्याला दिसले. काही दिवसांपूर्वी एका चित्रीकरणादरम्यान चाहत्याला कानाखाली मारतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अर्थात यानंतर त्यांनी सारवासारव करत चुकीने हा प्रकार घडल्याचे सांगितले. अर्थात नानांना राग अनावर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आता याबाबत त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले असून अभिनेता बनला नसतो तर आपण अंडरवर्ल्डमध्ये असतो असे म्हटले आहे.
नाना पाटेकर यांनी आपल्यात किती राग भरलेला आहे हे देखील सांगितले. अर्थात आपण उगाचच संताप करत नाही असेही ते म्हणाले. काहीतरी चुकीचे घडत असल्यावरच आपल्याला राग अनावर होतो असे ते म्हणाले. सिद्धार्थ कननशी गप्पा मारताना त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
राग तर येतोच. कुणी कितीही मोठा कलाकार असला तरी मी त्याला सुनावतो. जर मी चुकीचे करत असेल तर त्यालाही तो अधिकार आहे. मग तो ज्युनियर आर्टिस्ट असो किंवा सीनियर आर्टिस्ट असो. तो देखील एक कलाकार असून त्याचीही काहीतरी इज्जत आहे. परिस्थितीमुळे तो ज्युनिअर आरटीएस असतो. आम्ही कधीकाळी गर्दीचा भाग होतो. पन्नास वर्षापासून चित्रपट सृष्टी आम्हाला सोसतेय, असे नाना म्हणाले.
इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा लोक मला घाबरायचे. सायलेंट नाही तर व्हायलेंट होतो मी. मी ऐकत आहे नव्हतो आणि बोलतही नव्हतो. तेव्हा मी व्हायलेंट होतो पण आता नाही. पण आजही गोष्टी बिघडल्या तर हात उठतोच. त्यावेळी मला खूप राग यायचा. अर्थात मी अभिनेता झालो नसतो तर मी अंडरवर्ल्ड मध्ये असतो. हसायची गोष्ट नाही हे सत्य आहे. कॅमेरा समोर आल्यामुळे मी अभिनेता बनलो. मनातील राग बाहेर काढण्याचा हा देखील एक मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा दंगल झाली तर एक गरीब व्यक्ती देखील दगड उचलतो आणि मारतो, असेही नाना म्हणाले.
बोलता बोलता नाना पाटेकर यांनी आपण अनेक अभिनेत्यांना कानफटवले असल्याचे सांगितले. मी खूप लोकांना मारले पण आता आठवत नाही. खूप वाद व्हायचे. अर्थात तो आपल्याहून चांगलं काम करतोय म्हणून नाही तर तो चांगलं काम करत नव्हता म्हणून वाद व्हायचे. असेही नाना म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List