लाडकी बहीण योजनेवर आदिती तटकरे यांनी पत्रकच काढलं, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरल्या होत्या. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा तपासले जातील, अनेक महिलांचे अर्ज रद्द होतील असे काही व्हिडीओ आणि रील्स व्हायरल झाले होते. त्यावर माजी मंत्री आणि आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्रक काढून तटकरे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
एक्सवर तटकरे यांनी हे पत्रक शेअर केले आहे. तसेच पोस्टमजध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.
तसेच एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून याबाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी, याबाबत समाज माध्यमांतून होणाऱ्या अपप्रचारास कोणीही बळी पडू नये अशी विनंतीही तटकरे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास… pic.twitter.com/mtOnnIAWNo
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 11, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List