#Photo: परभणीतील बंदला हिंसक वळण, पाहा क्षणचित्रे
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. या संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून परभणीत कडकडीत बंद होता. यावेळी काही आंदोलकांनी रस्त्यावर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक काही भागात दगडफेकीच्या घटना समोर आल्या. पोलीस प्रशासन आणि आंदोलक यांच्यात काही भागात बाचाबाची झाली. तर काही भागात संतप्त जमावानं पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक करत विरोध दर्शवला. पोलिसांनी देखील आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. पाहा क्षणचित्रे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List