हार्डवेअर दुकानदारांना लुबाडणारे गजाआड
हार्डवेअर दुकानदारांकडून कॅश ऑन डिलिव्हरीवर विविध वस्तू मागवायचा. त्यानुसार दुकानदाराने साहित्य पाठवून दिल्यावर ते घेऊन येणाऱ्या व्यक्तीची पद्धतशीर दिशाभूल करून ते साहित्य घेऊन पसार होणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना काळाचौकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हार्डवेअर दुकानदार मोनील बिमल यांना विराज जैन नावाच्या व्यक्तीने फोन केला आणि रंगाचे डब्बे व अन्य साहित्य कॉटनग्रीन येथील पत्त्यावर पाठविण्यास सांगितले. साहित्य मिळाल्यावर पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार मोनील यांनी हजारो रुपयांचे साहित्य त्यांच्या ओळखीच्या टॅक्सी चालकाकरवी पाठवून दिले. टॅक्सी कॉटनग्रीन येथे येताच आरोपीने टॅक्सीतील अर्धेअधिक साहित्य काढून घेतले.
थोडेफार साहित्य गोदामात न्यायचे असल्याचे सांगत टॅक्सी पुढे नेली. मग काही अंतरावर टॅक्सी थांबवून चावी आणतो असे सांगत भामट्याने पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच मोमीन यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण, व्यवहारे, तसेच सांळुखे, खांडेकर, पवार, पालवी, चव्हाण या पथकाने तपास करून निरंजनसिंह राजपूत याला अटक केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List