भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात, अनेकांना उडवलं
मुंबईत अपघाताची मोठी घटना घडली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झाला आहे. बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती आहे. भरधाव बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगाने मार्केटमध्ये घुसलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे. घटनेनंतर आता घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत.
एलबीएस रोड हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. तिथे मार्केटसुद्धा आहे. असं असताना या परिसरात भरधाव बस चालवण्यात आली. भरधाव बेस्टने अनेक वाहनांना धडक दिली आहे. बेस्ट बसने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झालेला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंत अवस्थेत होता.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत गर्दीला बाजूला सारत बचावकार्याला सुरुवात केली आहे. जखमींना आणि मृतकांना तातडीने रुग्णालयात नेलं जात आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर या मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांकडून चौकशी सुरु झाली आहे. बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु झाला आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव बसने अनेक गाड्यांना उडवले असून त्यामध्ये असलेले प्रवास गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List