पुण्यात कारचा भीषण अपघात, दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी
बारामतीहून भिगवणकडे जाणाऱ्या कारचे वळणावर नियंत्रण सुटल्याने भीषण अपघाताची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर भिगवण येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दशु शर्मा आणि आदित्य कणसे अशी मयतांची नावे आहेत. तर चेष्टा बिश्नोई आणि कृष्णासून सिंग हे जखमी आहेत.
बारामतीतील रेड बर्ड या वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रशिक्षण घेणारे चार वैमानिक सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कारने भिगवणकडे चालले होते. यावेळी वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारचा भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांचे पथक, बारामती तालुका पोलिसांचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ जखमींना भिगवण येथील रुग्णालयात नेले. मयत दशु शर्मा ही मूळची दिल्लीची तर आदित्य कणसे मूळचा मुंबईचा रहिवासी आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List