नेरुळच्या निधी बारमध्ये छम छम, 18 बारबालांसह 24 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

नेरुळच्या निधी बारमध्ये छम छम, 18 बारबालांसह 24 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

डान्सबारवर कायद्याने बंदी असली तरी नवी मुंबईतील अनेक लेडीज बारमध्ये चोरी छुपके छम छम सुरूच आहे. नेरुळ येथील सेक्टर 1 मध्ये शिरवणे गावात असलेल्या निधी स्टार गोल्डन बारवर पोलिसांनी छापा मारून 18 बारबालांसह 24 जणांच्या मुसक्या आवळल्या. कारवाई झाली तेव्हा या सर्व बारबाला ग्राहकांशी अश्लील चाळे करताना आढळून आल्या. निधी बारवर झालेल्या या धडक कारवाईमुळे चोरून डान्सबार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबईत शिरवणे गाव हे बारवाले आणि बारबालांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गावात रात्री तळीरामांची जत्रेप्रमाणे गर्दी असते. याच गावातील निधी गोल्डन बारमध्ये बारबालांची छम छम सुरू आहे, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजकिरण कोलते यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री 10 वाजता या बारवर छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी 18 बारबाला विचित्र अंगविक्षेप करून ग्राहकांशी अश्लील चाळे करीत होत्या. पोलिसांनी या सर्वच बारबालांसह हॉटेलचा मालक विशाल केवट (19), सुजलकुमार केवट (19), नीरजकुमार वर्मा (19), रोशनकुमार केसरी (18), संजय साह (33) आणि धीरज राय (32) यांना अटक केली. याप्रकरणी नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर कटपाळे पुढील तपास करीत आहेत.

कारवाई फक्त थातूरमातूर

बारबाला आणि बारवाल्यांमुळे शिरवणे गावातील रहिवासी हैराण झाले आहेत. पोलिसांची कारवाई ही फक्त तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो अशा स्वरूपाची आहे. निधी बारप्रकरणी कारवाई केलेल्या सहा मुख्य आरोपींपैकी चार जण हे 19 वर्षे वयोगटातील आहेत. जे खरे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी पाठीशी घातले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही बारमध्ये असा अश्लील हैदोस सुरूच राहतो, अशी खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभागप्रमुख श्रीकांत भोईर यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्लू अर्जुन प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एकाला अटक अल्लू अर्जुन प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एकाला अटक
हैदराबादच्या संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचा बाऊन्सर अँथनी याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 4...
बोनी कपूर यांच्या प्रपोजलनंतर श्रीदेवींनी धरला होता अबोला; “विवाहित अन् 2 मुलांचे पिता असून तुम्ही..”
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अल्लू अर्जुन भावूक; चेंगराचेंगरीचे व्हिडीओ पाहून..
चेंगराचेंगरीत दुखापतग्रस्त झालेल्या मुलाकडून 20 दिवसांनंतर प्रतिसाद; वडील म्हणाले “अल्लू अर्जुनने..”
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला राजगड; आग्र्याहून सुटकेचा 358 वा स्मृतिदिन साजरा
चुकीच्या वृत्तांमुळे राहुरी कृषी विद्यापीठाची बदनामी, कर्मचाऱ्यांकडून निषेध; कुलसचिवांना दिले निवेदन
प्रीपेड मीटरला गडहिंग्लजमध्ये नागरिकांचा विरोध, 6 जानेवारीला महावितरण कार्यालयावर काढणार मोर्चा