श्री सिद्धिविनायकाचे सिंदूर लेपन
मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील ‘श्रीं’च्या मूर्तीला बुधवार 11 डिसेंबर ते रविवार 15 डिसेंबर या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. परंतु श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन भाविकांना दिले जाईल. सोमवार 16 डिसेंबर या दिवशी ‘श्रीं’च्या मूर्तीचा प्रोक्षणविधी, नैवेद्य व आरती झाल्यानंतर दुपारी 1 वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभाऱयातून श्रींचे दर्शन देण्यात येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्यावतीने देण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List