बेळगावात मराठी माणसांवर अन्याय, शिवसेनेचा राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला. पण कर्नाटक पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. असे असले तरी शिवसेनेचे आमदार रतन टाटांच्या शोकसभेला उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू म्हणाले की, आज विधानसभेच्या दोन्ही सभागृहामध्ये महामहीम राज्यपाल भाषण करणार आहेत. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बहिष्कार घालणार आहेत. बेळगाव कारवार सीमाप्रश्नी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांना सभा घेण्यासाठीही नकार देण्यात आला आहे. सीमावासी बांधवांवर हा मोठा अन्याय आहे. असे असले तरी रतन टाटांच्या शोकसभेला सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत असेही प्रभू यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List