पंढरपूर ते पंजाब सायकलस्वारी, डोंबिवलीच्या हर्षल सरोदेची आगळी वारी
हरी नामाचा जप करत पंढरपूर येथून संत शिरोमणी नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबच्या घुमानपर्यंत एका माऊलीने सायकल वारी केली. डोंबिवलीच्या हर्षल सरोदे या माऊलीने 23 दिवसांत 2674 किलोमीटर अंतर पार करत यशस्वी यात्रा पूर्ण केली. हर्षल सरोदे यांनी यापूर्वीही लांबपल्ल्याच्या अनेक सायकल फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
एमआयडीसी रहिवासी परिसरात हर्षल सरोदे यांचा ‘एव्हरग्रीन सायकलप्रेमी’ हा ग्रुप आहे. या ग्रुपचा उद्देश आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण हा आहे. ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ महिला, घरकाम तक सायकल शिकवण्याचे धडे देण्यात येतात. ग्रुपच्या वतीने पंढरपूर ते घुमान सायकल वारी करण्याचा संकल्प केला. यामध्ये 100 जण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हर्षल सरोदे यांनी कोणत्याही सपोर्ट वाहनाची मदत न घेता ही यात्रा पूर्ण केली. या प्रवासात त्यांच्या सायकलमध्ये अनेकदा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र त्या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी सायकल यात्रा पूर्ण केली.
नागरिकांच्या वतीने सन्मान
यशस्वी वारी केल्याबद्दल हर्षल सरोदे यांचा डोंबिवली येथे सत्कार करण्यात आला. पद्मश्री गजानन माने यांच्या हस्ते एमआयडीसी मिलापनगर येथील वंदे मातरम उद्यानात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हर्षल सरोदे यांनी या सायकल वारीतील अनुभव कथन केले. यावेळी वर्षा भट, राजू नलावडे, सरोज विश्वामित्रे, राजश्री खैरे, योगिता थोटांगे, कल्पना बोंडे, वर्षा महाडिक आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List