मराठमोळ्या अभिनेत्रीचं बिकिनीत प्रेग्नंसी फोटोशूट; स्टार प्रवाहच्या मालिकेत केलंय काम
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री नेहा गद्रे लवकरच आई होणार आहे. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच प्रेग्नंसी फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
नेहाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे. सध्या ती ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून तिच्या समुद्रकिनारी तिने खास फोटोशूट केलंय. नेहाचे बिकिनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
'बेबीमून पिक्चर्स' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. बाळंतपणाआधी पतीसोबत घालवलेल्या निवांत वेळेला किंवा ट्रिपला 'बेबीमून' असंही म्हणतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List