ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल विचारताच अभिषेकची अशी प्रतिक्रिया; रितेशने थेट पायच धरले
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र त्यावर दोघांनी अद्याप कोणतीच थेट प्रतिक्रिया दिली नाही. या चर्चांदरम्यान आता अभिषेक आणि ऐश्वर्याचं वैवाहिक आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. यामागचं कारण म्हणजे अभिषेकला नुकत्याच एका कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न. त्याने रितेश देशमुखच्या ‘केस तो बनता ही है’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रितेशने त्याला ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच अभिषेक गालातल्या गालात हसू लागला.
या शोमध्ये रितेशने आधी बच्चन कुटुंबातील नावांबद्दल प्रश्न विचारला. “अमिताभजी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक. या सर्व नावांची सुरुवात अ या अक्षराने होते. मग जया आंटी आणि श्वेता यांचीच नावं अशी वेगळी का”, असा सवाल रितेशने अभिषेकला केला. त्यावर अभिषेक हसत म्हणाला, “हा प्रश्न तुला त्यांनाच विचारावा लागेल. पण माझ्या मते आमच्या घरात ही प्रथाच झाली आहे. अभिषेक, आराध्या..” त्याने आपलं म्हणणं पूर्ण करण्याआधीच रितेश थांबवत पुढे म्हणतो, “आराध्यानंतर?” तेव्हा अभिषेक उत्तर देतो, “नाही, आता पुढची पिढी येईल तेव्हा पाहुयात ना.”
View this post on Instagram
A post shared by Hiraaya by Aayushi | Destination Wedding Photographer (@hiraayabyaayushi)
अभिषेकचं उत्तर ऐकल्यानंतर रितेश त्याला दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारतो. हा प्रश्न ऐकल्यानंतर अभिषेक गालातल्या गालातच हसू लागतो. तरीही हास्यावर नियंत्रण आणून तो रितेशला म्हणतो, “वयाचा विचार कर जरा, रितेश. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.” हे ऐकल्यानंतर रितेश लगेचच अभिषेकच्या पाया पडू लागतो. या दोघांमधील हा मजेशीर संवाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केलं. त्यांची मुलगी आराध्या नुकतीच 13 वर्षांची झाली आहे. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला अभिषेक आणि ऐश्वर्याने वेगवेगळी एण्ट्री केल्यापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या लग्नाला अभिषेक संपूर्ण बच्चन कुटुंबीयांसह पोहोचला होता. तर ऐश्वर्या आणि आराध्या नंतर दोघीच आल्या होत्या. मात्र नुकत्याच एका हाय प्रोफाइल लग्न समारंभातील फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्रच असल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दोघं एकत्र झळकत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List