बिग बींसमोर थेट शर्ट काढला, पत्नीला मिठी अन् बनियनवर स्टेजवर धावला; KBCच्या मंचावर स्पर्धकाचे हसू

बिग बींसमोर थेट शर्ट काढला, पत्नीला मिठी अन् बनियनवर स्टेजवर धावला; KBCच्या मंचावर स्पर्धकाचे हसू

अमिताभ बच्चन यांचा KBCचा 16 वा सिझन इतर सिझनप्रमाणे चांगलाच गाजतोय. KBC च्या प्रत्येक सिझनमध्ये काहीना काही किस्से घडतच असतात. आणि काही किस्से हे इतके व्हायरल होतात की ते आजही लक्षात राहण्यासारखे असतात. असाच एक किस्सा आहे ज्याची आजही चर्चा होते. हा किस्सा आहे KBC 14 मधला. या सिझनमध्ये असा एक स्पर्धक आलेला ज्याने आनंदाच्या भरात चक्क अमिताभ यांच्यासमोर शर्ट काढला होता.

KBC च्या मंचावरील मजेदार किस्सा

केबीसीच्या मंचावर पहिल्यांदाच एक स्पर्धक फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा विजय साजरा करताना दिसला. गुजरातमधून आलेल्या या स्पर्धकाने त्याला त्याच्या विजयाचा इतका आनंद झाला की त्यांनी शोमध्ये सर्वांसमोर त्याचा शर्ट काढला.

या स्पर्धकाचे नाव होते विजय गुप्ता. बिग बींनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट विनर विजय गुप्ताचे नाव घेताच ते आनंदाने नाचू लागले. एवढच नाही तर त्यांनी चक्क आपला शर्ट काढून तो हाताने फिरवत अख्ख्या स्टेजवर धावू लागले, एवढच नाही तर त्यांनी ऑडिअन्समध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नीला खेचत तिला मिठीही मारली. हे सर्व पाहून अमिताभ बच्चनही चांगलेच शॉक झाले.

त्यानंतर अमिताभ यांनी विजय यांना शर्ट घालण्याची विनंतही केली. अमिताभ यांनी म्हटलं “लवकर शर्ट घाला आम्हाला भीती वाटते की कपडे इतरत्र कुठेही उतरू नयेत.

“सोप्या प्रश्नाचे आत्मविश्वासाने चुकीचे उत्तर”

शर्ट काढून स्टेजवर फिरणाऱ्या विजय गुप्तांचा आनंद आणि उत्साह फार वेळ टीकू शकला नाही. ते मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने हॉट सीटवर बसले खरे पण 40 हजार रुपयांच्या साध्या प्रश्नाला डॉक्टरांनी अगदी आत्मविश्वासाने चुकीचे उत्तर दिले. त्यानंतर ते केवळ 10 हजार रुपये जिंकून तो घरी परतले.

विजय गुप्ता यांना 40 हजार रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता तो असा, हिंदू पौराणिक कथेनुसार रावणाने जबरदस्तीने पुष्पक विमान कोणाकडून हडप केले? A- इंद्र, B- कुबेर, C- जटायू किंवा D- माया. बरोबर उत्तर B- कुबेर होते. विजय गुप्ता यांनी शोमधून जास्त पैसे जिंकले नव्हते पण प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.  या स्पर्धकाचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला होता.

दरम्यान आता सुरु असलेल्या KBC 16 च्या मंचावरही बरेच किस्से घडत असतात किंवा बरेच असे स्पर्धक असतात ज्यांच्या हुशारीची चर्चा होताना दिसते. त्यातील म्हणजे KBC साठी पश्चिम बंगालमधील रायगंज येथून आलेला अन् 10 वी पास असलेला चहाविक्रेता मिंटू सरकार. याने त्याच्या बुद्धाच्या जोरावर चक्क 25 लाख जिंकले. त्याच्या खेळाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 231 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला तीन पक्ष...
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मंत्री होताच गोगावले हवेत, नेटकऱ्यांचा निशाणा
वंदे भारतच रस्ता चुकली! सीएसएमटी -मडगाव प्रवास मात्र व्हाया कल्याण; वाचा नेमके काय झाले…
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन, 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास