ड्रग्ज केस, अंडरवर्ल्ड कनेक्शन, टॉपलेस फोटोशूट.. 25 वर्षांनंतर महाकुंभसाठी भारतात परतली वादग्रस्त अभिनेत्री
बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री आल्या, ज्यांनी खूप नाव कमावलं आणि अचानक त्यांनी इंडस्ट्रीला रामराम केला. या यादीत अभिनेत्री ममता कुलकर्णीचंही नाव आहे. तिने ‘तिरंगा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ती ‘करण अर्जुन’, ‘सबसे बडा खिलाडी’ आणि ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. करिअरच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्री अचानक सोडली. तिचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन जोडल्यानंतर स्टारडम हळूहळू कमी होऊ लागलं होतं. आता बऱ्याच दिवसांनंतर ती तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये ममताने असा दावा केला आहे की ती 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे.
ममता कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती भारतात परत आल्यानंतर भावना व्यक्त करताना दिसतेय. यावेळी ममता भावूकसुद्धा झाली होती. “मी 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे. 2000 पासून मी भारताबाहेर राहतेय. हा संपूर्ण प्रवास खूपच भावूक होता आणि आता 2024 मध्ये मी पुन्हा मायदेशी परतली आहे. मला खूप आनंद होत आहे. हा आनंद मला शब्दांत मांडता येत नाहीये. मी फ्लाइट लँड होताना विमानातून माझ्या देशाकडे पाहत होती. ते क्षण माझ्यासाठी खूपच खास होते. या मातृभूमीवर पुन्हा पाय ठेवून मी धन्य झाले”, असं ती या व्हिडीओत म्हणतेय. हा व्हिडीओ शेअर करत ममताने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘मी 25 वर्षांनंतर भारतात परतली आहे. 12 वर्षांच्या तपस्येनंतर 2012 मध्ये मी कुंभ मेळ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर आता ठीक 12 वर्षांनंतर मी महाकुंभसाठी परतली आहे.’
ममता कुलकर्णी तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. 1993 मध्ये अभिनेत्रीने स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. हे मासिकाचे प्रकाशित होताच बर्यापैकी खळबळ उडाली होती. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. ममताबद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केलं. परंतु, अभिनेत्रीने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं. असं म्हणतात की ममता विकीसोबत 10 वर्षे दुबईत राहत होती. त्याचबरोबर असंही म्हटलं जात होतं की, तिने तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामंही केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List