जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमी नाही…, कोणावर भडकले अमिताभ बच्चन?
Amitabh Bachchan Post: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्रत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला आहे. दोघांच्या घटस्फोटाची चर्चा रंगत असताना महानायक अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमी नाही…’ असं म्हटलं आहे. सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि सोशल मीडिया यांचं घट्ट नातं आहे. अनेक विषयांवरील स्वतःचं मत अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्याम माध्यमातून मांडत असतात.
आता देखील अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहिला आहे. बिग बी म्हणाले, ‘जगात मूर्ख आणि मतिमंद लोकांची कमी नाही… हे असे लोक आहेत, जे इतरांबद्दल खोट्या किंवा बनावट गोष्टी प्रकाशित करत असतात. खरं तर, असे लोक इतरांच्या आडून स्वतःचे दुष्कृत्य लपवण्याचा प्रयत्न करतात.” ‘
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट केली आहे. याआधीही बिग बींनी अफवा पसरवणाऱ्या किंवा तथ्य नसलेल्या बातम्या पसरवणाऱ्यांना फटकारणारी पोस्ट शेअर केली होती.
अमिताभ बच्चन म्हणाले होते, ‘मी माझ्या कुटुंबाबद्दल फार कमी बोलतो. कारण ते माझं क्षेत्र आहे आणि मला त्याची प्रायव्हसी जपायची आहे. अंदाज फक्त अनुमान आहेत आणि ते कोणत्याही सत्याशिवाय खोटे आहेत. तर्क हे कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता फक्त अंदाज बांधून केलेले तर्क असतात… अफवा फक्त खोट्या असतात.’
‘अफवांमध्ये काहीच तथ्य नसतं… त्याची पडताळणी व्हायला हवी… त्यांच्या आवडीचा व्यवसाय करण्याच्या त्यांच्या निर्णयावर मी शंका घेऊ नये. त्यांच्या समाजातील योगदानाचं मी कौतुक केलं पाहिजे… पण खोटं आणि प्रश्नचिन्ह त्यांची कायद्याच्या कचाटयातून रक्षा करु शकेल… पण प्रश्नचिन्ह उपस्थित करून संशयाचे बीज पेरले गेलं आहे.’ असं देखील अमिताभ बच्चन म्हणाले होते.
एवढंच नाही तर, 2 डिसेंबर 2024 रोजी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं. ‘चूप’ हाच एक शब्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट केला आहे. शिवाय पुढे राग येणारा इमोजी देखील पोस्ट केला आहे. ऐश्वर्या राय हिने नावापुढील बच्चन आडनाव हटवल्यानंतर बिग बी यांनी ट्विट केलं.
बिग बी कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बिग कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List