बेळगावमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि यांचे कौतुक सोहळे सुरू आहेत; आदित्य ठाकरे यांची टीका
विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीवर शिवसेनेने बहिष्कार घातला होता. त्याबाबत विधानभवनाबाहेर बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला फटकारले आहे
”शिवसेनेने स्पीकरच्या निवडीवर बहिष्कार घातला होता. ही निवड आम्ही बिनविरोध करण्याचे जाहीर केले मात्र त्यानंतर ज्या अध्यक्षांचे नाव समोर आले त्या अध्यक्षांनी गेली अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार चालवण्याला मदत केली, लवाद म्हणून त्यांनी शिवसेना फोडण्याबाबत जो निकाल दिला तो चुकीचा होता. हा अन्याय ही, जखम ताजी आहे. आमची हिच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षात असा अन्याय होणार नाही याची गॅऱंटी मिळणं गरजेचं आहे. हे आश्वासन कुणी देणार का? आत जो कौतुक सोहळा सुरू आहे. हा कौतुक सोहळा होत असताना बेळगावमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय. तिथलं वातावरण चिघळत चाललंय. आमच्या कार्यकर्त्यांना अटका होत आहेत”, अशा शब्दात महायुती सरकारला फटकारले आहे. तसेच कर्नाटकात सरकार कोणाचंही असलं तरी मराठी माणसाच्या सोबत राहू, अन्याय सहन करणार नाही, असंही सांगितलं.
मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आवाज उठवला होता तेव्हा तत्कालिन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सीमाभागात अधिकचा फंड देऊ, सोयी सुविधा देऊन तिथल्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले होते. त्यावर काही झालं का, केंद्रातील भाजप सरकार या भागाला केंद्रशासित करणार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या या अन्यायाचा तीव्र निषेध. बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच! माझं कर्नाटकातल्या सरकारला आवाहन आहे की त्यांनी मराठी माणसांवरचा हा अन्याय तातडीने थांबवावा! महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितापेक्षा मोठं काहीही नाही. आणि केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे की हा सर्व विवादित भाग तातडीने केंद्रशासित करावा, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List