बेळगावकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखले
बेळगावात आज महाराष्ट्र एकिकरण समितीच्या महामेळावा आयोजित केला होता. मात्र या मेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारात महामेळावा होऊच नये यासाठी परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. कर्नाटक सरकारचा विरोध करत सीमाभागातून बेळगावकडे निघालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी अडवलं आहे.
काय चाललं आहे या देशात. बााबासाहेबांनी संविधान दिलं. ही लोकशाही नाही, ठोकशाही आहे. दादागिरी आहे. हुकुमशाहीच्या दिशेने चाललोय. कर्नाटक सरकारचे पोलीस आम्हाला अडवतायत. आम्ही काय अतिरेकी आहोत का? आम्ही कायम मराठी माणसांच्या पाठीशी आहोत, असे शिवसेना उपनेते, कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
”कर्नाटक सरकार मराठी माणसांना कशासाठी घाबरते आहे? वर्षानुवर्षे जो आपला भाग आहे, अतिक्रमण कर्नाटक सरकारने केले आहे त्या भागात अधिवेशन होत आहे. लोकशाही मार्गाने भूमिका मांडणे हा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. मराठी बांधवांसाठी आम्ही कायम ठामपणे उभे आहोत यापुढेही उभे राहणार”, असेही संजय पवार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List