अल्पवयीन मुलाने केला हल्ला, डोंगरी बालगृहातील घटना
डोंगरी बालगृहात गंभीर गुह्यात असलेल्या अल्पवयीन मुलाने गृहपाल आणि पोलीस, सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्या मुलाने बालगृहातील टीव्हीचे नुकसान करत स्वतःला जखमी केले. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी त्या मुलावर कारवाई केली.
गेल्या वर्षी ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प येथे त्या मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी एकाची हत्या केली होती. हत्येच्या गुह्यात त्या मुलावर ट्रॉम्बे पोलिसांनी कारवाई केली होती. त्या मुलाचे वय 18 वर्ष 11 महिने असल्याने त्याला डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. शनिवारी दुपारी मुलांना जेवण आणि नाश्ता देण्याचे काम बालगृहाचे केअर टेकर करत होते. केअर टेकर, सुरक्षा रक्षक आणि पोलीस एका खोलीतून दुसऱया खोलीत जात होते. तेव्हा त्या मुलाने लोखंडी दरवाजामधून हात बाहेर काढून सुरक्षा रक्षकाच्या पाठीत मारले. त्यानंतर गृहपाल तेथे चौकशीसाठी आले. तेव्हा त्या मुलाने लोखंडी दरवाजातून दोन्ही हात बाहेर काढून गृहपालची मान पकडली. तसेच त्याचा गळा दाबला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने केअर टेकरची सुटका झाली. याची माहिती डोंगरी पोलिसांना देण्यात आली.
त्यानंतर पोलीस केंद्र प्रभारी अधिकाऱ्यांसोबत त्या मुलाच्या खोलीत गेले. तेव्हा त्याने भीतीवर लावलेला टीव्ही फोडला. तो सर्वांना शिवीगाळ करत होता. त्या मुलाने स्वतःलाही जखमी करून घेतले. स्टीलचे टेबल उचलून ते फेकण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला शांत राहण्यास सांगितले. तेव्हा त्याने पोलिसांची मान पकडली. तसेच पोलिसांच्या मानेवर पेनाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इतर सुरक्षा रक्षकाने त्या मुलाला पकडले. केअर टेकरने केअर टेकरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या मुलाविरोधात कारवाई केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List