चऱ्होलीकर म्हणतात ‘तुतारी वाजवा, सातबारा वाचवा’, अजित गव्हाणे यांच्या रॅलीला प्रतिसाद
भोसरी विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारात विविध घोषणा वापरल्या जात आहेत. भोसरी गावठाणामध्ये ‘एकी हेच बळ’, ‘आम्हाला खेळ संपवता येतो’ या घोषणा चांगल्याच रंगल्या होत्या. तर चहोली येथे तर ‘तुतारी वाजवा, सातबारा वाचवा’ ही घोषणा भोसरी मतदारसंघात लक्षवेधी ठरत आहे.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार रॅलीला चहोली भागात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगरसेविका विनया तापकीर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर, दत्ता बुर्डे, कुणाल तापकीर, सागर तापकीर, सुनील पठारे, हरिभाऊ तापकीर, सचिन तात्या तापकीर, अनुज तापकीर, संदीप तापकीर, प्रशांत तापकीर, गणेश ताजने, सोमनाथ तापकीर, चेतन तापकीर, शुभम तापकीर, राजू वाखारे, संतोष तापकीर, विक्रम गिलबिले, श्रेयस चिखले आदी उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले, चहोली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये हजारो नागरिक वास्तव्याला आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस चहोली परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागामध्ये पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज आहे. आगामी काळात महिला भगिनींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असे आश्वासन यावेळी गव्हाणे यांनी दिले.
सांगोला मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार; शिवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा विश्वास
मोशीकर ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांचा विजय निश्चित असतो. अजित गव्हाणे यांच्या पाठीशी मोशीकर एकवटले आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री नक्की झाली असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला. श्री नागेश्वर महाराजांना दंडवत घालून प्रांजळ आशीर्वाद मागणाऱ्या अजित गव्हाणे यांना निवडून आणायचे की नागेश्वर महाराजांसमोर शड्डू ठोकणाऱ्या मयूर प्रवृत्तीला पुढे न्यायचे, असा सवाल उबाळे यांनी केला.
मोशी येथे आयोजित दौऱ्याची सुरुवात श्री नागेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. यावेळी उबाळे बोलत होत्या. यानिमित्ताने माजी नगरसेवक बबन बोराटे, धनंजय आल्हाट, लक्ष्मण सस्ते, वसंत बोराटे, संजय नेवाळे, परशुराम आल्हाट, माजी नगरसेविका विनया तापकीर, हरिभाऊ सस्ते, नीलेश मस्के, तुषार सहाने, वैशाली गव्हाणे, नीलेश मुटके, रूपाली आल्हाट आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List