अजित पवार, सुप्रिया सुळेंसह राजकीय नेत्यांचं मतदान; घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सगळ्याचं लक्ष आहे. असं असताना उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच युगेंद्र पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
सुरेश भोळे यांनी मतदानाचा हक्क बजावला
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जळगाव शहरातील प्रताप नगर येथील रत्ना जैन प्राथमिक विद्यामंदिर येथील केंद्रावर जाऊन त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी सकाळी लवकर जाऊनच आमदार सुरेश भोळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जनतेसमोर विकासाच्या मुद्द्यावर गेलो असून जनता मला तिसऱ्यांदा आशीर्वाद देईल असा विश्वास आहे. जास्तीत जास्त मतदान करा, असं आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केलं आहे.
सामंत- विखे यांनी बजावला मतदानाचा हक्क
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार उदय सामंत यांनी मतदान केलं आहे. सामंत यांनी पाली गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 इथे बजावला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांसोबत रांगेत उभे राहत सामंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नी शालिनीताई विखे पाटील, मुलगा सुजय विखे, सुनबाई धनश्री विखे यांच्यासह परिवाराने मतदान केलं आहे. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात मतदान केलं आहे. मतदानानंतर विखे पाटलांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
माकपचे नेते आणि सोलापूर शहर मध्यचे उमेदवार नरसिया अडम यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. नरसय्या आडम यांच्या पत्नी कामिनी आडम, मुलगा निलेश, मुलगी निलिमा आणि सून रोहिणी यांनी एकत्रित मतदान केलं आहे. नरसय्या आडम हे सोलापूर शहर मध्य मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
बच्चू कडू थोड्याच वेळात मतदान करणार
आमदार बच्चू कडू काही वेळातच आपल्या कुटूंबासह बजावणार मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यापूर्वी पत्नी डॉ नयना कडू यांनी बच्चू कडू यांचं औक्षण केलं आहे. यावेळी नयना कडू यांनी बच्चू कडू यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बच्चू कडू हे पाचव्यांदा विधानसभा निवडणूकिला सामोरे जात आहेत. बच्चू कडू हे सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. या निवडणुकीत बच्चू कडू यांच्या विरोधात काँग्रेसचे बबलू देशमुख, आणि भाजपचे प्रवीण तायडे निवडणूक रिंगणात आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List