नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?

नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते रत्नागिरीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, ते आता गद्दारांना आडवं करणार आहेत. कोकणचं भविष्य तुमच्या हातात आहे. दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली असं म्हणत त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेतला जोरदार निशाणा साधला.

दरम्यान त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मोदींच्या अशुभ हस्ते उभा केलेला शिवरायांचा पुतळाही आठ महिन्यांमध्ये कोसळला. त्यांनी माफीही गुर्मीत मागितली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील राज्य सरकारला टोला लगावला आहे. दीड हजार रुपयांत घर चालंत का, महागाई इतकी वाढली की दीड हजार येईपर्यंत संपतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी काही घोषणा देखील केल्या आहेत.  सत्ता आल्यावर शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार वाढवणार, जनतेला दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देणार. महाराष्ट्रात महिलांसाठी स्वातंत्र पोलीस ठाणे निर्माण करणार, प्रत्येकाला शिक्षण मोफत देणार, जीवन आवश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्र नंबर एकला होता. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना असा काय गुन्हा केला असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या उध्दव ठाकरेंनी भगव्या झेंड्याला डाग लावण्याचे काम केले, त्या उध्दव ठाकरेंना कोकणात बसायला जागा मिळणार नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे! मुंबईकरांना मिळणार स्वच्छ, ताजे खाद्यपदार्थ
मुंबईकरांना दूषित अन्न सेवनापासून परावृत्त करून आरोग्यदायी अन्न देण्यास प्रवृत्त करण्यासाठी सुमारे 10 हजार परवानाधारक खाद्यविव्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न...
पूजा खेडकरला अटक होणार, दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 
वांद्रे येथील भारतीय विमा संस्थानात वेतनवाढ करार; भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या पाठपुराव्याला यश 
‘म्युच्युअल फंड सही है’ जाहिरातीविरुद्ध याचिका
सनी लिओनी घेत होती सरकारी योजनेचा लाभ
दहशतवाद्यांच्या साथीदाराला मुंबईतून ठोकल्या बेड्या