संजय राऊतांवर निशाणा, सतेज पाटलांवर टीकास्त्र; प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले?

संजय राऊतांवर निशाणा, सतेज पाटलांवर टीकास्त्र; प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले?

फोन टॅपिंग प्रकरणात आरोप असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची काल बदली झाली. आज संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. त्याला आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊत हाच बेकायदेशीर बिनबुडाची विधानं करणारा नेता आहे. बहिणींच्या बाबतीत त्यांना कोणत्याही प्रकारची लाज शरम नाही. अशाप्रकरची वक्तव्य समोर येत आहेत. रश्मी शुक्लांच्या बाबतीत जो काही आयोगाने निर्णय घेतला तो प्रशासकीय निर्णय आहे. अरविंद सावंत आणि सुनील राऊत यांची जीभ कशी झडत नाही, असं दरेकर म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेची काळजी संजय राऊत यांनी करू नये. आम्ही एकमेकांची काळजी घ्यायला समर्थ आहोत. उद्धव ठाकरे यांना धोका आहे. याची काळजी संजय राऊत यांनी करावी. पक्षात राहून पक्षप्रमुख यांना धोका देणाऱ्याला तसंच वाटतं, असं प्रविण दरेकर म्हणालेत.

सतेज पाटलांवर टीकास्त्र

काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तेव्हा सतेज पाटील हे आक्रमक झाले. त्यावरून प्रविण दरेकरांनी सतेज पाटलांवर निशाणा साधला. बंटी पाटील हे काँग्रेसच्या नेत्या मधुरिमाराजे यांच्या बद्दल काय बोलले, महाराष्ट्राने ऐकलं आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचा अपमान केला आहे. मतदानाच्या माध्यमातून मविआला चारी मुंड्या चीत आमच्या लाडक्या बहिणी करतील, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या विधानावर भाष्य

शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांचा आहे, ती उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही, असं राज ठाकरे काल म्हणाले. त्यांच्या या विधानावरही दरेकरांनी भाष्य केलं आहे. शिवसेना ही शिवसैनिकांची प्रॉपर्टी आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार शिंदे साहेबांनी घेऊन ज्या विषयाला तिलांजली उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तो वारसा पुढे घेऊन बाळासाहेबांच्या विचारांची प्रॉपर्टी शिवसेनेची आहे. जी शिवसेना कायद्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. शिवसैनिक हे बाळासाहेब यांची प्रॉपर्टी आहे शिंदेसाहेब शिवसैनिक आहेत. त्यांच्यासोबत शिवसैनिक आहेत, असं दरकरांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रातील सर्वात मोठा महासंग्राम, मतदानाचे अपडेट कुठे पाहाल? फक्त एक क्लिक आणि… महाराष्ट्रातील सर्वात मोठा महासंग्राम, मतदानाचे अपडेट कुठे पाहाल? फक्त एक क्लिक आणि…
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान सुरळीत पार पडावं म्हणून निवडणूक आयोग आणि...
ऐश्वर्यासोबत घटस्फोटाची चर्चा; अभिषेक जे बोलला ते ऐकूण अमिताभ भावुक, बिग बींच्या डोळ्यात अश्रू, Video
चांगली झोप हीच आरोग्याची गुरुकिल्ली, शांत झोपेसाठी या टीप्स आवश्य फॉलो करा
Assembly Election 2024 – रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात, पोलीस यंत्रना सज्ज
मतदानासाठी बुधवारी शेअर बाजार, बँका बंद; सरकारी सुटी जाहीर
देख रहा है विनोद! व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका
हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत? राहुल गांधी यांचा थेट नरेंद्र मोदी यांना सवाल