ए. आर. रेहमान – सायरा बानू यांचा घटस्फोट, ’30 वर्ष एकत्र राहू अशी अपेक्षा होती पण…’

ए. आर. रेहमान – सायरा बानू यांचा घटस्फोट, ’30 वर्ष एकत्र राहू अशी अपेक्षा होती पण…’

AR Rahman And Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी वकिलांनी एक निवेदन जारी करत दोघांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ शिवाय खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.

वंदना शाह यांनी जारी केलेल्या निवदनानुसार, ‘लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सायरा आणि बानू यांनी विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं वकील म्हणाल्या आहे.

घटस्फोटानंतर ए आर रेहमान यांची पोस्ट

एक्सवर (ट्विटर) ए आर रेहमान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लग्नानंतर 30 वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या भाराखाली देवाचे सिंहासन देखील हलू शकतं. असं असताना देखील आपण अर्थ शोधत असतो… आमच्या मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.’, ए. आर. रेहमान यांची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ए आर रेहमान आणि पत्नी सायरा बानू यांचं लग्न आणि मुलं

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न 1995 मध्ये केलं होतं. लग्नानंतर सायरा यांनी तीन मुलांना जन्म दिला. दोन मुली आणि एक मुलगा अशी त्यांची मुलं आहे. त्यांच्या मुलींची नावे खतीजा, रहीमा अशी असून मुलाचं नाव अमीन असं आहे.

सांगायचं झालं तर, सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाही. आणि अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nana Patole : मी तर शेतकऱ्याचा मुलगा, बिटकॉईन काय असतो मला नाही माहित, मतदानाच्या दिवशी वातावरण तापलं Nana Patole : मी तर शेतकऱ्याचा मुलगा, बिटकॉईन काय असतो मला नाही माहित, मतदानाच्या दिवशी वातावरण तापलं
राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. मतदानाच्या एक दिवस अगोदरच मोठे कांड झाले. पैसे वाटपाचा आरोप, उमेदवारांवर हल्ले करण्यात आले....
शिर्डीत मतदानासाठी विद्यार्थ्यांचा वापर?; राज्यात या ठिकाणी पण राडा, मतदान वाढीसाठी कुणाची काय खेळी?
Vinod Tawde : पैसे वाटपाच्या आरोपावर बोलताना विनोद तावडेंनी शरद पवारांचे आभार मानले, कारण…
VIDEO : मतदानापूर्वी अमित ठाकरे-सदा सरवणकर समोरासमोर, पुढे काय घडलं?
Raj Thackeray : वरळीत व्हायरल होणाऱ्या पत्रावर राज ठाकरे स्पष्टपणे बोलले, सत्य काय ते सांगितलं
शाहरुख खानच्या मुलासाठी कंगना रणौतची पोस्ट; म्हणाली, ‘फिल्मी कुटुंबातील मुलं फक्त मेकअप, वजन…’
ए. आर. रेहमान यांची किती आहे संपत्ती, पत्नी सायरा बानू यांनी किती मिळणार पोटगी?