भाऊ कदम राष्ट्रवादीत?, अजितदादांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; खुलासा काय?
राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी सुरु आहे. राज्याच्या विधानसभा निडणुकीच्या पाश्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशात विनोदवीर अभिनेते भाऊ कदम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली आहे. भाऊ कदम यांनी अजित पवार यांची देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. सध्या त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अजित पवार यांच्या एक्सवर (ट्विटर) भेटी एक फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे. ‘आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. श्री. सुनील तटकरे, श्री. सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.’ असं कॅप्शन फोटो पोस्ट करत देण्यात आलं आहे.
आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. श्री. सुनील तटकरे, श्री. सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. pic.twitter.com/EwtruWtldd
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 5, 2024
सर्वत्र विधानसभा निडणुकीच्या चर्चा रंगलेल्या असताना भाऊ कदम आणि अजित पवार यांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत अभिनेते भाऊ कदम हे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा प्रचार करणार… अशा चर्चा आता जोर धरत आहेत. पण भाऊ कदम यांनी अधिकृत पक्षात प्रवेश केलेला नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.
सूरज चव्हाण अजित पवारांच्या प्रचारसभेत
भाऊ कदम यांच्या भेटीपूर्वी अजित पवार यांच्या प्रचारसभेत ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण सहभागी झाला होता. तोंडाला मास्क लावून सूरज चव्हाण सभेच्या ठिकाणी आला. मंचावर जात त्याने उपस्थितांना संबोधित केलं. अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पुष्पगुच्छ देत सूरज चव्हाणचं मंचावर स्वागत केलं.
‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सिझनची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाण याने अजित पवार यांची भेट घेतली होती. तेव्हा सूरजचा आपण टुमदार घर बांधून देणार आहोत…. असं वक्तव्य केलं होतं शिवाय अजित पवार यांनी सूरज याचं कौतुक देखील केलं होतं. पुढच्या दिवाळीपर्यंत तो त्याच्या नव्या घरात प्रवेश करेन. हा माझा शब्द आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की, अजित पवार जेव्हा शब्द देतो. तेव्हा तो शब्द तो पाळतो, असं अजित पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List