हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्या खोलीतून 10 लाख सापडले, FIR दाखल; निवडणूक आयोगाची माहिती
राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा आणि पैशांचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीसविनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. या घटनेवर निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्या हॉटेलच्या खोलीत सुमारे 10 लाख रुपये सापडल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तावडे यांच्या हॉटेलमधील रूममधून 9.93 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List