तुरुंगातून बाहेर येताच त्याचा गेम करणार; क्षत्रिय करणी सेनेची लॉरेन्स बिश्नोईला धमकी

तुरुंगातून बाहेर येताच त्याचा गेम करणार; क्षत्रिय करणी सेनेची लॉरेन्स बिश्नोईला धमकी

अभिनेता सलमान खानला धमकी, त्याच्या घरावर गोळीबार प्रकरण, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण या सर्व घटनांमागे बिश्नोई गँगचा हात आहे. त्याच्याकडून अनेकांना खंडणीसाठी धमक्या देण्यात येतात. तसेच ठार मारण्याचीही धमकी देण्यात येते. आता थेट बिश्नोई गँगच्या लॉरेन्स बिश्नोई यालाच धमकी देण्यात आली आहे. क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोईला ठार मारण्याची धमकी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातून बाहेर येताच त्याचा ठार करण्यार असल्याचे करणी सेनेनं म्हटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोईचे नाव चर्चेत आहे, सलमान खान, खासदार पप्पू यादव यांना बिश्नोईच्या नावाने धमक्या आल्या आहेत. मात्र, आता लॉरेन्स बिश्नोईलाच ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. क्षत्रिय करणी सेनेचे प्रमुख राज शेखावत यांनी ही धमकी दिल्ली आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी बिश्नोईवर एक कोटीचे बक्षीस ठेवले होते. त्यानंतर बिश्नोई समजाकाडून याचा निषेध करण्यात आला होता. आता त्यांनी थेट लॉरेन्स बिश्नोईला ठार मारण्याची धमकी दिली आहे.

राज शेखावत यांनी लॉरेन्स बिश्नोईला ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच त्यांनी एका हेल्पलाईनचीही घोषणा केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून कोणालाही धमकी देण्यात आल्यास किंवा खंडणीची मागणी झाल्यास आपल्या करणी सेनेकडून सुरक्षा पुरवण्यात येईल आणि बिश्नोई गँगच्या गुंडांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही फक्त महादेवाला घाबरतो. लॉरेन्सला का घाबरायचे? तो 12 वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याला जामिनही मिळालेला नाही. तुरुंगातून बाहेर पडलो तर ठार मारले जाण्याची त्यालाच भीती आहे. त्यामुळे तो तुंरुगातच आहे. ज्या दिवशी तो तुरुंगाबाहेर येईल त्या दिवशी आपण त्याला ठार मारू. तो दहशतवादी आहे, ज्या दिवशी तो तुरुंगातून बाहेर येईल आम्ही त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार करू, असेही शेखावत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Assembly Election 2024 – रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात, पोलीस यंत्रना सज्ज Assembly Election 2024 – रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात, पोलीस यंत्रना सज्ज
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होत आहे....
मतदानासाठी बुधवारी शेअर बाजार, बँका बंद; सरकारी सुटी जाहीर
देख रहा है विनोद! व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची भाजपवर जोरदार टीका
हे पाच कोटी कुणाच्या SAFE मधून निघाले आहेत? राहुल गांधी यांचा थेट नरेंद्र मोदी यांना सवाल
 भाजपाकडून खुलेआम पैसे वाटप होत असताना निवडणूक आयोग काय झोपला आहे का? सचिन सावंत यांचा हल्लाबोल 
ही सगळी भ्रष्ट्र आणि दहशतवादी राजवट खतम करून टाक, उद्धव ठाकरे यांचे तुळजाभवानीला साकडे
नाशिकमधील हॉटेलमध्ये 1 कोटी 98 लाखांची रोकड सापडली; मिंधे गटाच्या उमेदवारासाठी पैसे आल्याची चर्चा