भाजपवाले पैसा बाटेंगे तो ही जितेंगे, संजय राऊत यांचा घणाघात
भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरार नालासोपारा येथे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”निवडणूक प्रचाराच्या वेळी आमच्या बॅगा तपासल्या गेल्या. हेलिकॉप्टर, गाड्या तपासल्या गेल्या. निवडणूक आयोगाने आमच्या मागे जो ससेमिरा लावला होता तो त्यांनी मिंधे, भाजप अजित पवार गटाच्या नेत्यांमागे लावला असता. भाजपवाल्यांचे महाराष्ट्रात पैसा बाटेंगे तो ही जितेंगे असे झाले आहे. त्यामुळे ते पैसे वाटत सुटले आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List