लग्नाचे वचन देऊन भाजप नेत्याचा महिलेवर अत्याचार, दुसऱ्या मुलीशी लग्न करताना महिलेने केली तक्रार
एका भाजप नेत्याने महिलेला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारिरीक संबध ठेवले होते. पण जेव्हा लग्न करायची वेळ आली तेव्हा या भाजप नेत्याने दुसऱ्याच तरुणीशी लग्न ठरवले होते. पीडित महिलेने भाजप नेत्याच्या साखरपुड्यात जाऊन भंडाफोड केला, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये भुपेंद्र सोहागरे याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. सोहागरे हा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष आहे. पीडीतेने दिलेल्या माहितीनुसार सोहागरे आणि महिलात 2008 साली एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तीन वर्षांपासून सोहागरे महिलेला प्रेमाची मागणी घालत होता. पण महिलेने त्याला सतत नकार दिला. अखे चार वर्षानंतर महिलेने सोहागरेला होकार दिला. त्यानंतर सोहागरेने महिलेला लग्नाचे वचनही दिले होते.
2013 साली महिला नोकरीला लागली. सिंगरौलीच्या एका शाळेत ही महिला शिक्षिका म्हणून रुजू झाली. महिलेला सुटी असताना सोहागरे तिला भेटायला जायचा. लग्नाचे वचन देऊन सोहागरेने महिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. 2013 ते 2020 दरम्यान लग्नाचे वचन देऊन सोहागरेने महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले आणि जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघायचा तेव्हा शरीरसंबंध विषय टाळायचा.
महिलेला सोहागरच्या दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. तेव्हा ती तरुणी आपली नातेवाईक असे सोहागरेने खोटं सांगितलं. इतकंच नाही तर महिलेला लग्नासाठी नकार दिला. तुझ्याशी लग्न केलं तर माझी समाजात बदनामी होईल आणि पक्षातले पदही हातातून जाईल असेही सोहागरेने महिलेला सांगितले.
16 नोव्हेंबरला पीडित महिलेला कळाले की भुपेंद्र सोहागरे दुसऱ्याच तरुणीशी साखरपुडा करतोय. तेव्हा महिला सोहागरेच्या घरी पोहोचली. सोहागरे जेव्हा दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा करतोय हे महिलेला कळालं तेव्हा तिने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी या प्रकरणी भाजप नेता भुपेंद्र सोहागरे विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच याबाबत पुढील तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List