दापोली विधानसभा मतदार संघाचे नऊ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
On
दापोली विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोणत्याही उमेदवाराने निवडणुकीचा अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रणसंग्रामात नऊ उमेदवार आपले नशीब अजमावत असल्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संतोष अबगुल शिवसेनेकडून आम. योगेश कदम, शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माजी आमदार संजय कदम, बहुजन समाज पार्टी कडून प्रवीण मर्चंडे, अपक्ष म्हणून योगेश कदम, योगेश कदम, संजय कदम, संजय कदम व ज्ञानदेव खांबे यांचा समावेश आहे. या निवडणुकीमध्ये तीन योगेश कदम व तीन संजय कदम यांनी निवडणूक अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
सोमवारी निवडणूकीचे उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्याही उमेदवारांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले.
263 दापोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, या निवडणुकीमध्ये 5697 नव मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. तसेच 1 लाख 39 हजार 895 पुरुष व 1 लाख 51, 402 स्त्रिया मिळून 2 लाख 91 हजार 297 मतदार आपला निवडणुकीचा बजावणार आहेत. यामध्ये 85 वर्षावरील उमेदवारांची संख्या मतदारांची संख्या 3560 असून 1609 दिव्यांग मतदार देखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याकरिता 470 EVM मशीनची तर 57 राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या तर तीन मिनीबसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या निवडणुकीमध्ये गृह मतदारांची संख्या 930 असून याकरिता 42 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. असे ते म्हणाले.
प्रत्येक मतदान केंद्रात एकच मशीन असणार असून 14 दिवस उमेदवारांना प्रचाराकरिता मिळणार आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा देण्यात आलेली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वर या सभागृहात पार पडणार आहे. याकरिता डॉ. सुमित जरंगण यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत दापोली विधानसभा क्षेत्रात 391 मतदान केंद्रांची केंद्र असणार आहेत. या निवडणुकीत 229 सर्विस वोटर देखील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याकरिता 1724 कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेल्या लोकसभेला 57.37 तर विधानसभेला 63.93% मतदान झालेले होते अशी माहिती देखील उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त मतदारांनी यावेळी मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
सुष्मिताचे 10 वर्ष मोठ्या उद्योजकासोबत प्रेमसंबंध, वडिलांना नव्हती कल्पना, पण उद्योजकाच्या मुलाचं मोठं वक्तव्य
19 Nov 2024 10:03:54
Happy Birthday Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आतापर्यंत एक दोन नाही तर, 11 सेलिब्रिटींना डेट केलं आहे. पण कोणासोबच...
Comment List