Army Plane Crashes Agra: हिंदुस्थानी लष्कराचं विमान आग्र्यात कोसळलं; पायलट, सहपायलट थोडक्यात बचावले
उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे हिंदुस्थानी लष्कराचं विमान कोसळलं आहे. हवेतच विमानाला आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात पायलटसह एक जण बचावला गेला आहे. कागरौल येथील सोंगा गावाजवळील शेतात हे विमान कोसळलं.
A MiG-29 fighter jet has crashed near Agra, Uttar Pradesh. The pilot has ejected from the plane. The plane had taken off from Adampur in Punjab and was en route to Agra for an exercise when the incident happened. More details awaited. Court of Inquiry to be ordered: Defence… pic.twitter.com/L6a7zxaBbV
— ANI (@ANI) November 4, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी पायलट आणि अन्य एका व्यक्तीने विमानाबाहेर उडी घेत आपला जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत.
विमान शेतात पडल्याचे पाहून गावातील लोकही तातडीने तेथे पोहोचले. अपघातानंतर तत्काळ चौकशीचे आदेश जारी करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करता यावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.
By-Election Date Change: उत्तर प्रदेश, पंजाब, केरळमधील पोटनिवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?
एनएनआय वृत्तसंस्थाने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं आहे की, हे अपघातग्रस्त विमान मिग-29 आहे. पंजाबमधील आदमपूर येथून या विमानानं उड्डाण केलं होतं. हे विमान आग्रा येथे जात असताना हा अपघात घडला. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List