International Mens Day 2024 : पुरुषांना असतो या 5 आजारांपासून धोका ? वेळीच व्हा सावध
दरवर्षी 19 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवस पुरुषांचे आरोग्य, कल्याण आणि समाजातील त्यांचे योगदान लक्षात ठेवण्यासाठी साजरा केला जातो. अशात एका गंभीर समस्येवर आपले लक्ष वेधणार आहोत. पुरुषांना धावपळीच्या जीवनात स्वत:च्या प्रकृतीकडे पुरेसे लक्षण देण्यासाठी वेळ नसल्याने त्यांना 5 गंभीर आजाराचा धोका असतो. खराब लाईफस्टाईल आणि अनहेल्दी जेवणामुळे आज पुरुषांना अनेक आजार जडत आहे. एकेकाळी या आजारांना महिलांशी जोडले जायचे. बदलत्या लाईफस्टाईल आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे पुरुषांना कोणते आजार होत आहेत. ताण-तणावाच्या जीवनशैलीमुळे आता पुरुषांच्या आरोग्याला कसा धोका निर्माण झाला आहे हे पाहूयात…
पुरुषांत हे आजार बळावत आहेत…
हृदय रोगाचे वाढते वाढ –
हॉर्ट अटॅक आणि स्ट्रोक पुरुषांच्या मृत्यूला सर्वाधित जबाबदार आजार मानले जात आहेत. अनहेल्दी जेवण, स्मोकिंग आणि फिजिकल एक्टीविटीची कमतरता यामुळे हे आजार बळावत चालले आहेत.
डायबिटीज –
टाईप – 2 डायबिटीज पुरुषांत वेगाने वाढत आहे. अनुवांशिक कारणाने तसेच लठ्ठपणा वाढल्याने तसेच फिजीकल एक्टीव्हीटी कमी केल्याने डायबिटीजचे प्रमाण वाढत आहे.
कॅन्सर –
प्रोस्टेट कॅन्सर पुरुषांमध्ये सर्रास आढळणारा कॅन्सर आहे. तसेच फुप्फुसाचा कॅन्सर, कोलोन आणि लिव्हर कॅन्सर हे कॅन्सर पुरुषांसाठी जीवघातक ठरले आहेत.
मेंटल हेल्थशी संबंधित समस्या –
डिप्रेशन, एंग्जायटी आणि मेंटल हेल्थशी संबंधित आजार पुरुषांमध्ये सर्वसामान्य बनले आहेत. कामाचा दबाव,कौटुंबिक समस्या आणि सामाजिक अपेक्षा यामुळे पुरुषांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे.
सेक्युअल हेल्थ संबंधित समस्या –
इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेश आणि सेक्शुअल हेल्थशी जोडलेल्या समस्या पुरुषांचे आरोग्यच नाही तर त्यांचा आत्मविश्वास देखील कमी करीत असतात.काही प्रकरणात हे आजार वैवाहिक नातेसंबंधांना देखील खराब करत आहेत.
पुरुषांना का आहे जास्त धोका ?
चुकीचा आहार – जंक फूड, मद्य आणि तंबाखू याच्या सेवनाने डिजीज, लठ्ठपणा आणि कॅन्सर या सारख्या आजाराने धोका वाढलेला आहे.
फिजिकल एक्टीव्हीटीची कमतरता –
लठ्ठपणा, हॉर्ट डिसिज आणि डायबिटीज यामागे फिजिकल एक्टीव्हीटीची कमतरता धोका वाढवत आहे.
स्ट्रेस – कामाचा दबाव, कौटुंबिक समस्या, आणि मेंटल हेल्थशी संबंधित समस्या देखील या आजाराला वाढवत आहेत.
स्मोकिंग – हृदयाशी संबंधित आजार, फुप्फुसाचा कॅन्सर आणि असे अन्य आजाराच्या मागे स्मोकींग ( धूम्रपान ) देखील जबाबदार आहे.
लठ्ठपणा – हार्ट डीजिज, डायबिटीज आणि कॅन्सर सारखे अनेक आजारांचा धोका वाढण्यामागे लठ्ठपणा कारणीभूत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List