एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है; विनोद तावडेंचा प्रति शाब्दिक हल्ला

एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है; विनोद तावडेंचा प्रति शाब्दिक हल्ला

काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है, तो सेफ है’ विधानावर हल्ला चढवला. ‘एक है तो सेफ हैं…’ म्हणजे नरेंद्र मोदीजी आहेत. अमित शाह आहे. गौतम अदानी सेफ आहेत. नुकसान कोणाचे होणार आहे तर धारावीचे होणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले. यावेळी भर पत्रकार परिषदेत एका बॉक्समधून नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा फोटो काढून दाखवला. राहुल गांधी यांच्या या आरोपांना भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

तावडेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

आज सकाळी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली. ८ नेते मंचावर होते, २ राज्यातील आणि ६ बाहेरचे होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक सेफ काढली. एक है तो सेफ है त्यातून अदानी आणि मोदीजींचे फोटो काढले. असे फोटो काढायचेच असतील तर अदानी आणि वाड्रा यांचे देखील आहेत, असं म्हणत विनोद तावडे यांनी फोटो दाखवले आहेत.

अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना शशी थरूर यांच्या बरोबर तेलंगाणातील मुख्यमंत्री यांच्या बरोबर हरियाणातील २०१४ आधी मुख्यमंत्र्यांबरोबरचे फोटो दाखवू शकतो. आम्ही देखील अदानी आणि काँग्रेसचं नातं कसं जुनं आहे. २०१४ आधी अदानींच्या वाढ झाली. गुजरातमध्ये चिमणभाईंनी पोर्ट दिला. राजीव गांधींच्या काळात माझी ग्रोथ झाली असं अदानी स्वत:चं म्हणाले आहेत. अदानींचा सर्वात जास्त विकास झाला तो कांग्रेसच्या काळात सरकारची कशी मदत झाली. २०१४ आधीचे आणि नंतरचे प्रोजेक्टची लिस्ट आहे, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.

विनोद तावडेंचा भाजपवर निशाणा

बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे असताना नियमावली बनवली होती. सेटलिंक होती, आणि त्यात कंत्राट अदानींना मिळालं. जे लोक धारावीत राहतात त्या सर्वांना घरं मिळणार आहे. धारावीत जे राहतात अधिकृत नाही त्यांना देखील घरं मिळणार आहे. इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टी देखील मिळणार आहे. ५०० चौ. फुटाचा कार्पेट असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी यांना धारावीकरांना झोपडीतच ठेवायचं आहे. शेख यांना ते कंत्राट मिळालं नाही म्हणून चिंता आहे का? एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है हे म्हणायचं का?, असं हल्लाबोल विनोद तावडे यांनी केला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तुम्ही व्होट करायला जाण्याआधी तुमचे नाव मतदार यादीत आहे का...
मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?
यंदाच्या निवडणुकीत कोट्यवधींची मालमत्ता जप्त, निवडणूक आयोगाच्या पथकाची जबरदस्त कामगिरी
राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटले? भर सभेत मागचं सगळं काढलं
एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है; विनोद तावडेंचा प्रति शाब्दिक हल्ला
“अर्जून कपूरच्या आठवणीत टल्ली…” रेस्टॉरंटमधून बाहेर आलेल्या मलायकाला चालता येईना, मित्राने सावरलं; नेटकऱ्यांकडून ट्रोल
रक्ताळलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल; बॉलिवूड अभिनेत्रीचा भिषण कार अपघात, सेलिब्रिटींकडून चिंता व्यक्त