“अर्जून कपूरच्या आठवणीत टल्ली…” रेस्टॉरंटमधून बाहेर आलेल्या मलायकाला चालता येईना, मित्राने सावरलं; नेटकऱ्यांकडून ट्रोल
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आता तिच्या फिल्मी दुनियेपक्षाही तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. त्यातील महत्त्वाचा आणि सर्वात जास्त चर्चेला आलेला विषय म्हणजे तिचा आणि अर्जून कपूरचा ब्रेकअप. मलायका आणि अर्जूनबाबतच्या सगळ्याच गोष्टी सध्या चर्चेचा विषय ठरतोय. मात्र आता पुपन्हा एकदा मलायका चर्चेत आली आहे तेही तिच्या खाजगी आयुष्यामुळेच. पण अर्जून कपूरमुळे नाही तर डिनर पार्टीमुळे.
त्याच झालं असं, काही दिवसांपूर्वी मलायका आपल्या मित्रांसोबत डिनरला बाहेर गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे मित्र दिसले. जेव्हा मलायका रेस्टॉरंटमधून बाहेर पडली तेव्हा तिला चालताही येत नसल्याचे किंवा चालताना तिचा सारखा पाय घसरत असल्याचे दिसून येत आहे. मित्राने तिच्या हाताला पकडून तिला तिच्या कारजवळ आणून सोडल्याचे दिसून आले. दरम्यान मलायकाचा डिनर पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मलायकाचा हा व्हिडीओ बघून चाहते खूप वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. “मलायकाला तिचा तोल का सावरता येत नाही?”, “आता ती म्हातारी झाली का?”, तसेच एकाने कमेंट केली आहे की, ” अर्जून कपूरच्या आठवणीत जास्त घेतली का?” अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
दरम्यान चालताना तिचा वारंवार जाणारा तोल पाहता आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहाता अनेकांनी कमेटंमध्ये तिने अल्कोहोलचे सेवन म्हटले. मलायकाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर तिचे ‘नोव्हेंबर चॅलेंज’ शेअर केले होते ज्यात नो अल्कोहोल आणि टॉक्सिक लोकांपासून दूर राहणे तसेच हेल्थी जेवण, व्यायाम अशा अनेक गोष्टींचा समावेश तिच्या लिस्टमध्ये केल्या होत्या. मात्र तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत तिच्या पोस्टबाबतही वक्तव्य केलं.
बऱ्याच युजरसने लिहिलं आहे की ‘नोव्हेंबर चॅलेंज’ मध्ये तर ‘नो अल्कोहोल’ लिहिलं होतं मग आता काय झालं? असे प्रश्न उपस्थित करत मलायकाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. मलायकाने मात्र नेहमीप्रमाणे या ट्रोलिंगकडे दूर्लक्ष करत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List