सलमान ‘बिग बॉस’ सोडणार? नवीन होस्टची झलक पाहिली का, शोच्या सेटवर थेट बुलेटवरून एन्ट्री
‘बिग बॉस हिंदी 18’ चा सिझन हा घरातील सदस्यांमुळे जेवढा गाजतोय तेवढाच तो सलमान खानच्या चर्चांमुळेही गाजतोय. कारण बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेवढी सुरक्षाही त्याला पुरवण्यात आली आहे. सलमान खानने बिग बॉसच्या सेटवर शुटींगसाठी येणेही योग्य नसल्याचे म्हटले जातं होते. मात्र तरीही सलमान खानने आपला शब्द पाळत शुटींग पूर्ण केले.
सलमान ‘बिग बॉस’ सोडणार?
सलमान बिग बॉस शो सोडणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं ते एका व्हिडीओमुळे. कारण या वीकेंडला सलमान ऐवजी रवी किशनने घरातल्या सदस्यांची शाळा घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे बिग बॉसचा होस्ट बदलला का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कलर्स टिव्हीकडून नुकताच रवी किशन यांचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रवी किशन हे घरातल्या सदस्यांची शाळा घेताना दिसत आहेत.
मात्र फक्त रवी किशन एकटे नाही तर ते सलमानसोबत घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहेत. त्यामुळे सलमान खान या वीकेंडच्या वारला नसणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. रवी किशन यांच्यासमोरच घरातल्या सदस्यांची बरीच बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
रवी किशन यांची दमदार एन्ट्री
बिग बॉसच्या सेटवर रवी किशन यांची दमदार एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. “इथे जेवणापासून ते अंघोळीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये हाय दईया असतं. म्हणजेच घरात बराच वाद सुरु असतात. त्याचसाठी आता रवी भैय्या आले असल्याचे रवी किशन म्हणाले.
त्यानंतर पुढे ते म्हणतात की, “दिवाळीच्या दिवशी मी ड्युटीवर आलोय तर आतिषबाजी तर होणारच. आता पाहुया कोणाचे रॉकेट सुटतायेत आणि कुणाची चक्र फिरणार” त्यानंतर रवी किशन यांनी घरातील सदस्यांना सल्लेही दिले.
विकेंड का वार पाहण्यासाठी प्रेक्षकाची उत्सुकता
एरवी घरात सारखे एकमेकांसोबत वादावादी सुरु असणारे चाहत पांडे आणि विवियन यांच्यात आता ‘विकेंड का वार’ मध्ये सलमानसमोरच खडाजंगी होणार आहे. त्य़ामुळे आताच विकेंड हा चांगलाच रंजक असणार आहे. त्यामुळे प्रोमो पाहून रवी किशन आणि सलमान खान मिळून कशापद्धतीने घरच्यांची शाळा घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List