शह-काटशह – मूल्याधारित राजकारणाला शह अमेरिकेतील निवडणूक

शह-काटशह – मूल्याधारित राजकारणाला शह अमेरिकेतील निवडणूक

>> डॉ. ज्योती धर्माधिकारी

नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. अमेरिकेतील सर्व महिला कमला हॅरिस यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे उत्साहित झालेल्या होत्या आणि त्यांचं नाणं खणखणीत असल्यामुळे कमला हॅरिस यांचा विजय अगदी निश्चित होता. पण ‘ग्लास सिलिंग’ फोडण्याच्या अत्यंत नामी संधीने कमला हॅरिस यांना हुलकावणी दिली.

अमेरिकेच्या यंदाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस महासत्ता अमेरिकेचा लोकशाहीवादी, उदारमतवादी, स्वातंत्र्याचा चेहरा होता. 2024 च्या निवडणुकीमध्ये कमला हॅरिस यांच्याकडे मूल्य आणि तत्त्व यांची सांगड असलेलं एक व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिलं गेलं. अमेरिकेसारख्या देशामध्ये जिथे स्वातंत्र्य आणि लोकशाहीची बूज राखणे हे परमोच्च कर्तव्य समजले जाते अशा देशात कमला हॅरिस यांचा जाहीरनामा हा देशाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि घटनात्मक मूल्ये प्रदान करणारा जाहीरनामा होता. अमेरिकेतील सर्व महिला कमला हॅरिस यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे उत्साहित झालेल्या होत्या आणि त्यांचं नाणं खणखणीत असल्यामुळे कमला हॅरिस यांचा विजय अगदी निश्चित होता. मग नेमकं काय घडलं?

नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी जाहीर झालेली होती. मात्र डेमोक्रेटिक पक्षातर्फे बायडेन की कमला हॅरिस या दोन चेहऱयांबद्दल संभ्रम होता. शेवटी उशिराने म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठीचा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे अमेरिकेतील लोकशाहीवादी, विवेकवादी, पुरोगाम्यांना उत्साह आला. उद्दाम, वर्चस्ववादी, बेफिकीर आणि ज्यांच्यावर आजही काही खटले सुरू आहेत अशा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध एक स्वच्छ चारित्र्याची मूल्याधारित राजकारण करणारी स्त्री उभी होती. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीच्या परिणामांचे जे काही आडाखे बांधले गेले, त्यामध्ये स्वाभाविकपणे कमला हॅरिस या जिंकून येणार याबद्दल कोणत्याही विवेकी माणसाच्या मनात प्रश्न नव्हता. मात्र 5 नोव्हेंबरचे निकाल हे अत्यंत धक्कादायक आणि मूल्याधारित राजकारणाला शह देणारे असे होते.

खरं तर या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे प्रभावी ठरले. कमला हॅरिस यांनी आपली स्त्राr प्रतिमा पुढे न करता आपले राजकीय आडाखे, अमेरिकेला प्रगतीपथावर घेऊन जाणारी मूल्ये, व्यक्ती स्वातंत्र्याची बूज राखणारे राजकारण, कायद्याचे राज्य, महिलांच्या सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार, स्थलांतरितांना प्रखर विरोध, महागाईवर नियंत्रण, कर प्रणाली अशा विविध मुद्दय़ांवर सातत्याने अमेरिकन नागरिकांसोबत संवाद साधला. उशिराने दाखल झालेल्या असल्या तरी कमला हॅरिस यांनी त्वरित आघाडी घेतली आणि जनमानसाचा लोकप्रिय चेहरा बनून राहिल्या. त्यांचा पराभवही असा काही दणदणीत पराभव नाही. ट्रम्प यांना अटीतटीच्या लढाईचा सामना करावा लागला.

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 2017 मध्ये हरलेल्या हिलरी क्लिंटन यांनी यंदा ‘ग्लास सिलिंग’ फोडणार अशी दणदणीत धमकीच दिली होती. समस्त स्त्रिया प्रेरणा आणि उत्साहाची सळसळ अनुभवत होत्या. राजकीय विश्लेषक हा निकाल स्वाभाविक असलेले सांगत असल्यामुळे कमला हॅरिस यांच्याबद्दल कोणाच्याही मनात काहीही शंका नव्हती.

तथापि, अमेरिकन जनतेने त्यांच्याऐवजी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात बहुसंख्य मते टाकून त्यांना विजयी केले. अर्थात, कमला हॅरिस यांनी हा पराभव अत्यंत खेळकरपणे स्वीकारला. मात्र,  ‘ग्लास सिलिंग’ फोडण्याच्या अत्यंत नामी संधीने कमला हॅरिस यांना हुलकावणी दिली.

कमला हॅरिस यांच्या पराभवाची अनेक राजकीय कारणे आहेत. त्यात सध्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडन यांचा कारभार त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला असे मानले जाते. डेमोक्रेटिक पक्षाला वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवता आले नाही, स्थलांतरितांच्या विरुद्ध ठोस भूमिका असल्यामुळे त्यांचाही रोष भोवला. व्यक्तिगत स्तरावर त्यांचे स्त्राrत्व आणि कृष्णवर्णीय व्यक्तिमत्त्व त्यांच्या विजयाच्या आड आलं.  त्यांचा हिंदुस्थानी चेहरा हा फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. त्यातही त्यांनी सुरुवातीच्या भाषणामध्ये आपण कृष्णवर्णीय महिला प्रतिनिधी आहोत असे जाहीर केले. दक्षिण-आशियाई नागरिकांचा त्या ठिकाणी भ्रमनिरास झाला. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीतही कमला हॅरिस यांची पीछेहाट झाली. ट्रम्प स्वतला प्रखर राष्ट्रवादी आणि पुरुषी नेतृत्व म्हणून प्रोजेक्ट करत असले तरी कमला हॅरिस घटनात्मक मूल्यांचे पूजक म्हणून स्वतला प्रोजेक्ट करत होत्या.

कमला हॅरिस (जन्म 20 ऑक्टोबर 1964, ओकलँड ) या वडिलांकडून आफ्रिकन-अमेरिकन, तर आईकडून साऊथ एशियन-अमेरिकन आहेत. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. कायद्यामध्येही त्यांचे शिक्षण झालेले आहे. पती डग्लस क्रेग एमहाफ (विवाह 2014) हे व्यवसायाने वकील आहेत. 2010 मध्ये हॅरिस अमेरिकन राजकारणामध्ये आल्या.

कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून त्यांनी दोन वेळा काम केले, 2016 मध्ये त्या सिनेट इलेक्शन जिंकल्या. त्या पहिल्याच साऊथ एशियन अमेरिकन सिनेटर ठरल्या, तर

07 नोव्हेंबर 2020 मध्ये त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडल्या. जानेवारी 2021 मध्ये त्यांचा शपथविधी पार पडला. त्या वेळी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन हे होते. त्यांची उपराष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द अत्यंत झंझावाती आणि धाडसी राहिली. अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. उपराष्ट्राध्यक्षपदाची कमला हॅरिस यांची कारकीर्द बघता राष्ट्राध्यक्षपदाच्या सच्चा, प्रखर दावेदार उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.

त्यामुळे या वेळी ही काचेची भिंत मोडून पडेल अशी खात्री होती. जगभरातल्या माझ्यासकट सर्व महिलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदावरती सर्वोच्च पदावरती एक महिला बसण्याचा अभिमान, स्वाभिमान मिळण्याची एक नामी संधी हुकली. त्यामुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले. अर्थात, निवडणूक ही काही एक किंवा दोन मुद्दय़ांच्या आधारे होत नसते. अमेरिकन राजकारणाला कमला हॅरिस नव्या नाहीत. उपराष्ट्राध्यक्षपदी त्यांची निवड होऊन तब्बल पाच वर्षे झालेली आहेत. त्यामुळे खुद्द अमेरिकेमध्ये त्यांच्या पराभवाचे विश्लेषण आणि जगभरात दुरून बघून होणारे विश्लेषण यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. सध्यातरी राष्ट्राध्यक्षपदाने महिलांना पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे.

[email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख व सहयोगी प्राध्यापक आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘शिवा’च्या प्रपोजलला अखेर आशू देणार उत्तर? मालिकेत मोठा ट्विस्ट ‘शिवा’च्या प्रपोजलला अखेर आशू देणार उत्तर? मालिकेत मोठा ट्विस्ट
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवाने आशूला प्रपोज केल्याचं संपदा सर्वांना सांगते....
आदर्श कुटुंब कसं असावं? समंथाच्या पूर्व पतीने मांडलेलं मत चर्चेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन, लष्कर-ए-तैयबाच्या सीईओच्या नावे फोन
मणिपुरमधील परिस्थिती अस्वस्थ करणारी… राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट करत मोदींना केले आवाहन
गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणी मोठा खुलासा, ISI कनेक्शन उघड
Manipur violence – मणिपूरमध्ये हिंसाचार सुरुच, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासह मंत्री-आमदारांच्या घरांवर हल्ला
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला, हिजबुल्लाहने दोन रॉकेट डागले