अभिनेत्रीचे 11 पुरुषांसोबत प्रेमसंबंध, 24 व्या वर्षी झाली आई पण आजही अविवाहित, जाणून व्हाल थक्क
Bollywood Actress Love Story: झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. पण त्यांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. तुम्ही अशा एका अभिनेत्रीला ओळखता जिने एकापेक्षा एक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं, पण अभिनेत्री खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. अभिनेत्रीचं नाव अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजकांसोबत जोडण्यात आलं. अभिनेत्रीच्या आयुष्यात एक दोन नाही तर तब्बल 11 वेळा प्रेमाची एन्ट्री झाली. पण अभिनेत्रीचं नातं कोणासोबत लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी आई झाल्यानंतर अभिनेत्री चर्चेत आली.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. सुष्मिता हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटी आणि उद्योजकांसोबत झाली. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री म्हणाली होती, ‘माझं आयुष्य एका खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. आयुष्यात तुम्ही जे काही निर्णय घेता… ते निर्णय वेदनादायी असू शकतात. पण आयुष्यातील प्रत्येक निर्णय काही न काही तरी आपल्याला शिकवून जातो…’
सुष्मिताच्या रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर, ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुडा, इम्तियाज खत्री, वसीम अकरम आणि मुदस्सर अजीज यांसारख्या 11 जणांना अभिनेत्रीने डेट केलं आहे. तर मॉडेल रोहमन शॉल याच्यासोबत देखील अभिनेत्रीाला अनेकदा स्पॉट केलं जातं.
सुष्मिता सेनचं करियर
‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणारी सुष्मिता सेन यशाच्या शिखरावर आहे. सुष्मिता सेन हिने मोठ्या पडद्यावर राज्य केल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘ताली’ आणि ‘आर्या’ मुळे सुष्मिता सेन यशाच्या शिखरावर पोहोचली.
सुष्मिता सेन हिच्या कामाचं कायम कौतुक झालं. पण अभिनेत्री लग्न केलं नाही. लग्न न करता अभिनेत्रीने दोन मुलींना दत्तक घ्यायचा निर्णय घेतला. वयाच्या 24 व्या वर्षी सुष्मिता हिने मोठ्या मुलीला दत्तक घेतलं. अभिनेत्री कायम दोन मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List