सभेची तुडुंब गर्दी, हेच ‘स्टार प्रचारक’, विकासकामांमुळे दिंडोशीत सुनील प्रभूंची हॅट्ट्रिक निश्चित

सभेची तुडुंब गर्दी, हेच ‘स्टार प्रचारक’, विकासकामांमुळे दिंडोशीत सुनील प्रभूंची हॅट्ट्रिक निश्चित

सुसज्ज रस्ते, मुबलक पाणी, पुनर्विकासाच्या प्रश्नांसह नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळाल्यामुळे दिंडोशी विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळेच मतदारांनी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांना दिंडोशीतून सलग दोन वेळा भरघोस मतांनी निवडून दिले. याच पार्श्वभूमीवर आज दिंडोशीत झालेल्या प्रचारसभेला तुडुंब गर्दी झाली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत  शिवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू हॅट्ट्रिक करणार असल्याचे स्पष्ट चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे. सभेला होणारी तुडुंब गर्दी हेच माझे ‘स्टार प्रचारक’ असून विकासाच्या मुद्दय़ावरच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी प्रभू म्हणाले.

दिंडोशी मतदारसंघात आयोजित सभेत सुनील प्रभू यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विरोधकांचे उमेदवार संजय निरुपम मतदारांना भूलथापा देत असून निवडणुका आल्या की त्यांना मतदार आठवतात, असा टोलाही प्रभू यांनी यावेळी लगावला. आपल्या कार्यकाळात दिंडोशीत रस्ता रुंदीकरण, पाण्याचा प्रश्न सोडवला, डायलिसिस सेंटर, वाचनालय, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, रत्नागिरी ते लोखंडवाला डीपी रोड, भुयारी मार्ग, नागरी निवारातील असेसमेंटचा प्रश्न, डीम्ड कन्व्हेंसचा प्रश्न अशी कामे केल्याचे ते म्हणाले. मालाड जलाशय टेकडीतील पाण्याची पातळी वाढवून नागरी निवारा परिषद परिसरात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असे प्रभू म्हणाले. यावेळी शिवसेना उपनेते संजय घाडी, शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, युवासेनेचे अंकित प्रभू, शिवसेना उत्तर प्रदेश प्रमुख अनिल सिंग, राष्ट्रवादीचे अजित रावराणे,  ‘आप’च्या रूबेन, अॅड. सुरेंद्र यादव, श्रीकांत मिश्रा, संतोष सिंग, दुर्गेश यादव, गौरीशंकर चौबे आदी उपस्थित होते.

निष्ठावंत नेता, आदर्श लोकप्रतिनिधी

सुनील प्रभू अभ्यासू प्रामाणिक निष्ठावंत, आदर्श लोकप्रतिनिधी, उत्कृष्ट वक्ता असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी बोलताना काढले. त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न जवळून माहिती असल्यामुळे ते विधानसभेत यासाठी आवाज उठवतात. ही लढाई आता महाराष्ट्रद्रोही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी असून यामध्ये निष्ठावंतच बाजी मारतील, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, सभांचा धडाका; शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, सभांचा धडाका; शाह, प्रियांका गांधींसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 17 नोव्हेंबर ते शनिवार 23 नोव्हेंबर 2024
मंथन – सरन्यायाधीशांची निवृत्ती : काही ‘प्रलंबित’ प्रश्न
वार्तापत्र भांडुप – निष्ठावंतांचे पारडे जड
शह-काटशह – मूल्याधारित राजकारणाला शह अमेरिकेतील निवडणूक
प्रयोगानुभव – समृद्धतेचा  हळुवार स्पर्श
सृजन संवाद – नेता कसा असावा?