‘या’ चित्रपटातील दृश्ये मन विचलीत करतात; मराठमोळ्या अभिनेत्रीची भूमिका तर, टीझर पाहूनच अंगावर काटा
‘महास्यजत्राची हास्यजत्रा’ मधील कल्याणची चुलबूली शिवाल परब तिच्या अवखळ आणि वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवत असते. तिच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करतात. पण आता शिवाली परब एक असा भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे ज्यामुळे शिवालीचे एक वेगळेच रुप पाहायला मिळणार आहे. शिवालीचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर अवलंबून असणार आहे.
सत्य घटनेवर आधारित चित्रपट
शिवाली परबचा ‘मंगला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मंगला’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून एक तरुण गायिकेवर झालेल्या ऍसिड हल्ल्याची ही कहाणी आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. पहिल्या अॅसिड हल्ल्यातून स्वत:ला सावरत एका गायिकेने तिच्या आयुष्याचा सुरेल प्रवास कसा घडवला हेच या चित्रपटातून सांगण्यात आले आहे. टीझरने चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. हा हल्ला तिच्यावर नेमका कोणत्या कारणास्तव झालेला आणि तिने या सर्व संकटावर कशापद्धतीने मात दिली हे सांगणारी ही कहाणी आहे.
17 जानेवारी 2025 रोजी चित्रपट प्रदर्शित
सिनेमा येत्या 17 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून नक्कीच अंगावर काटा उभा राहतो. त्यामुळे चित्रपटाची कथा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहे. हा विषय जरी मनोरंजनचा नसला तरी एखाद्या जीवघेण्या परिस्थितीवर मात देऊन स्वत:ला सावरायला बळ कसं एकवटून कसं पुन्हा उभं राहायचं हेच मंगलाच्या भूमिकेतून शिकण्यासारखं आहे.
टीझर पाहून नेटकरी म्हणाले ,” अंगावर काटा आला”….
या चित्रपटातील दृश्ये नक्कीच मन विचलीत करतात. पण त्या कहाणी मागून मंगलाची जिद्द आणि जगण्याची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हेही दाखवतात.
एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. शिवालीने चित्रपटाचा टीझर तिच्या सोशल मीडियावर शेअर केला असून “जन्मा- मरणाच्या आणि नशिबाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा ‘मंगला’” असं कॅप्शनही या टीझरच्या व्हिडीओला दिले आहे.
चित्रपटाचा टीझर पाहून नेटकऱ्यांना भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. सर्वात आधी त्यांनी शिवालीचे कौतुक केले आहे. तसेच टीझर पाहून “अंगावर काटा आला” असं म्हणत प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
दरम्यान ‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरी यांची असून संवाद प्रथमेश शिवलकर यांनी लिहिले आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List