दखल – ग्राम्य स्त्रीचे खडतर जीवन
>> आत्माराम नाटेकर
‘येरळाकाठची शेवंताबाई’ ही व्यक्तिचित्रणात्मक कादंबरी स्वरूपातील कथा लेखक संजय काळे यांनी वाचकांसमोर मांडताना शतकभरापूर्वीच्या ग्राम्य स्त्रीचे खडतर जीवन आपल्या ओघवत्या शैलीत उभे केले आहे. 29 प्रकरणांत तत्कालीन ग्रामीण जीवनाचा अनुभव या पुस्तकातून घेता येतो. ग्रामीण भागातील अशिक्षित, परंतु खंबीर अशा स्त्रीची कथा म्हणजे येरळाकाठची शेवंताबाई.
स्त्री जन्मल्यानंतर प्रथम मुलगी, मग पत्नी, नंतर माता या स्वरूपात तिच्या आयुष्यात स्थित्यंतरे येत राहतात. तिची आयुष्यातील भूमिका व जबाबदारी त्याप्रमाणे बदलत राहते. स्त्रीमधील जात्याच असलेल्या कणखरपणामुळे ती अशा वेगवेगळ्या भूमिका पेलताना संपूर्ण कुटुंबच नव्हे, तर सोबत समाजाला पुढे घेऊन जाते. समाज, रीती यांचे जोखड स्रियांनाच जास्त पेलावे लागते. तिची कथा सांगताना लेखक लिंगायत समाज, त्यातील रीतिरिवाज, रूढी याबाबत तपशील देतो. शेवंताबाईच्या कथेच्या ओघात युद्ध, तत्कालीन समाजस्थिती यांबाबत लेखक सुंदर तपशील देतो. येरळा नदीच्या तीरावरल्या छोटय़ाशा गावातली एक मागासवर्गीय अशिक्षित स्त्राr पती निधनानंतरच्या कठीण आयुष्यात ताठ मानेने कठीण परिस्थितीत आपला संसार रेटून नेताना आपल्या मुलांचे आयुष्य कसे घडवते याची कथा समजून घेण्यासाठी येरळाकाठची शेवंताबाई ही लेखक संजय काळे लिखित, महाजन पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशित कादंबरी आवर्जून वाचावयास हवी.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List