3 ते 4 वेळा गर्भपात, सरोगसी, पाचव्या महिन्यात मृत बाळाला जन्म; आई होण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चा जीवही धोक्यात घातला
आई होण्यासाठी एक स्त्री किती स्वप्न पाहते हे प्रत्येकाला माहित आहे. सगळ्या गोष्टींचा त्याग करून अगदी स्वत:लाही विसरून एक स्त्री बाळाला जन्म देण्याच्या सर्व प्रक्रियेतून जाते. पण ते सूख जर वारंवारं हातून निसटून जातं असेल तर मात्र ती अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही.
असंच काहीस घडलं होतं हिंदी मालिकांमधून काम करणाऱ्या अभिनेत्री वंदना सजनानी खट्टर यांच्यासोबत. बाळाला जन्म देण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने सांगितलं की, त्यांचे 4 गर्भपात, कित्येक वेळा IVF आणि सरोगसी केला पण त्याही असफल झाल्या.
तसेच लग्नाच्या ११ वर्षानंतर त्या आई झाल्या. वंदना यांनी सांगितले की त्यांना पाचवा महिना असताना बाळ पोटातच मृत पावले होते.
तेव्हा त्यांना ताबडतोब रुग्णालयातही नेण्यात आलं होतं. मात्र वंदना यांना या बाळाला नॉर्मल डिलीव्हरीनेच जन्म द्यायचा होता
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List