रोजच्या जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं? 99 टक्के लोकांना माहिती नाही योग्य प्रमाण
स्वयंपाकाला चव येते ती मिठामुळे काही जणांना जेवणात कमी मीठ लागते तर काहीजण जास्त मीठ टाकून पदार्थ खातात. मोठ्या प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदय विकार होऊ शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु शरीरात मीठ जास्त असणे जितके हानिकारक आहे. तितकेच ते कमी खाणे देखील जास्त धोकादायक आहे.
मिठाचे मुख्य घटक असलेल्या सोडियमच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. सोडियम आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांचे नियोजन करते जसे की रक्तदाब राखणे, स्नायू आणि मज्जातंतूंचे सामान्य कार्य आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे.मिठाच्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत त्याच्या आरोग्यावर काय परिणाम होतात आणि दररोज किती प्रमाणात मीठ खाणे हे गरजेचे आहे ते जाणून घेऊ.
भूक न लागणे
मिठाच्या कमतरतेमुळे भूक कमी होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते तेव्हा त्याचा परिणाम मज्जा संस्था आणि मेंदूच्या भूक नियंत्रित करणाऱ्या भागावर होतो. त्यामुळे भूक मंदावते आणि भूक न लागल्यामुळे पोषक तत्वांची कमतरता तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे शरीराला संसर्गजन्य आजात होण्याची शक्यता वाढते.
चक्कर येणे
शरीरातील सोडियमचे संतुलन हे रक्तदाबावर परिणाम करते. सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब पातळी कमी होते जे सामान्य आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी झाल्याने माणसाला चक्कर येते ही स्थिती गंभीर असू शकते. विशेषतः ज्यांना आधीच कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी.
डोके दुखणे
शरीरात मिठाच्या कमतरतेच एक सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी आहे. मिठामध्ये असलेले सोडियम शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते. जेव्हा शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते तेव्हा ते असंतुलन निर्माण करते ज्यामुळे शरीरातील निर्जलीकरणाचा धोका वाढतो.
थकवा आणि स्नायू कमकुवतपणा
सोडियमची कमतरता स्नायू आणि मज्जातंतूंच्या सामान्य कार्यात व्यत्यय आणू शकते मज्जातंतूंचे रक्ताभिसरण सुरळीत राखण्यासाठी सोडियम उपयुक्त आहे.
मिठाचे सेवन किती करावे
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार प्रौढ व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त पाच ग्रॅम मीठ खावे. अंदाजे एक चमचा इतके आहे. पाच ग्रॅम पेक्षा जास्त मीठ खाणे शरीरासाठी हानिकारक असू शकते आणि रक्तदाब, ह्रदयरोग तसेच पक्षघाताचा धोका वाढू शकतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List