मोठी दुर्घटना टळली! वंदे भारत ट्रेनला जनावराची धडक, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ
वाराणसीहून आग्र्याला येणारी वंदे भारत ट्रेनची सोमवारी रात्री मोठी दुर्घटना टळली आहे. छलेसर स्टेशनजवळ ट्रेनच्या इंजिनला जनावर धडकले. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोको पायलट आणि सहायक लोको पायलट सुरक्षित असल्याचे कळल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या घटनेनंतर दोन तास ट्रेन रखडली होती.
वंदे भारत ट्रेन कायम सकाळी सहा वाजता कँटच्या वाराणसीसाठी रवाना होते. दुपारी 1 च्या सुमारास वाराणसी येथे पोहोचल्यानंतर तीन वाजता ट्रेन आगऱ्याला परतते. सोमवारी ही ट्रेन आगऱ्याला परतताना छलेसर ते एतमादपुर दरम्यान ट्रेनने जनावराला धडक दिली. मोठा आवाज होऊन ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले. लोको पायलटने ट्रेन थांबवल्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक पथकाने पाहणी केली आणि सुमारे दोन तासांनंतर ट्रेन कँट स्थानकाकडे रवाना झाली. हा अपघात झाला तेव्हा ट्रेनचा वेग ताशी 50 किलोमीटर होता. लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावून ट्रेन थांबवली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List